News Flash

विवाहितेची हत्या करणाऱ्या प्रियकरास अटक

कांजुरमार्ग येथे काजूपाडा परिसरात राहणाऱ्या पूजा गायकवाड (२०) या तरुणीची रमाकांत सोनटक्के (२२) या त्याच परिसरात राहणाऱ्या तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

| July 7, 2013 05:35 am

कांजुरमार्ग येथे काजूपाडा परिसरात राहणाऱ्या पूजा गायकवाड (२०) या तरुणीची रमाकांत सोनटक्के (२२) या त्याच परिसरात राहणाऱ्या तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रमाकांतला अटक झाली आहे.
पूजा ही घाटकोपर येथे एका बँकेत नोकरी करत होती. शुक्रवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामाला गेली पण सायंकाळी घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरू केला होता. दरम्यान, काही स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून कर्वेनगर येथे एका तरुणीचा मृतदेह आढळल्याचे कळविले. तपासणीनंतर हा मृतदेह पूजाचा असल्याची ओळख पटली. रमाकांतने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.  
पोलिसांनी सांगितले की, रमाकांत आणि पूजाचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, परंतु गेल्या डिसेंबर महिन्यात पूजाचे लग्न झाले. काही महिन्यांनी नवरा मनोरुग्ण असल्याचे कळल्यानंतर ती माहेरी आली होती. त्यानंतर रमाकांत आणि पूजा पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. सगळे काही व्यवस्थित होते, पण पूजाचे अन्यत्र प्रेमसंबंध असल्याचा संशय रमाकांत याला होता. त्यावरून त्यांची भांडणे होत असत. या प्रकाराला कंटाळून पूजाने रमाकांतशी बोलणे थांबविले होते.  
दरम्यान, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी रमाकांतने शनिवारी पूजाला भेटायला बोलाविले. पूजा तेथे गेली असता तेथे रमाकांत व त्याचा मित्र राजू गुप्ता होता. पूजा आणि रमाकांत यांचे पुन्हा एकदा भांडण झाले आणि रमाकांतने तिच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. आपल्याला पूजाशी लग्न करायचे होते, पण तिचे दुसऱ्या कोणाबरोबर तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आमच्यात बिनसले होते. पूजा मला फसवत होती, असे रमाकांतने सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 5:35 am

Web Title: lover killed woman arrested
Next Stories
1 मुंबईत उद्या पाणीकपात
2 ‘एचडीएफसी’ बँकेला ग्राहक आयोगाचा दणका
3 उखाळ्यापाखाळ्या, आरोप-प्रत्यारोपांतून काँग्रेस-राष्ट्रवादीला राजकीय लाभ!
Just Now!
X