08 March 2021

News Flash

प्रेयसीवर वार करुन पळणाऱ्या प्रियकराचा अपघाती मृत्यू

प्रेयसीवर वार करून पळून जाणाऱ्या अनिल दांडेकर (२३) या तरुणाचा भरधाव जाणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. सोमवारी रात्री दहिसर येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही

| January 7, 2015 02:18 am

प्रेयसीवर वार करून पळून जाणाऱ्या अनिल दांडेकर (२३) या तरुणाचा भरधाव जाणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. सोमवारी रात्री दहिसर येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही दुर्घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
अनिल हा रिक्षाचालक असून बोरीवली पूर्वेच्या काजूपाडा येथे रहात होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे याच भागात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. ही तरुणी बारावीत शिकते. तो तिला आपल्या रिक्षातून शिकवणीसाठी नेण्याचे आणि आणण्याचे काम करत होता. दांडेकरने तिच्याशी लग्नासाठी तगादा लावला होता, पण त्यांच्यात वाद होता. सोमवारी या तरुणीला आपल्याच रिक्षातून शिकवणीसाठी अनिलने नेले होते. परतताना रात्री ९ च्या सुमारास रिक्षातच त्या दोघांचा वाद झाला. संतापलेल्या दांडेकरने दहिसरच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आडोशाला रिक्षा थांबवली आणि धारदार शस्त्राने तिच्यावर गळ्यावर आणि छातीवर सपासर सात ते आठ वार केले. तिला त्याच जखमी अवस्थेत रिक्षात सोडून तो पळून जात होता. मात्र त्याचवेळी एका भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दांडेकरला धडक दिली. दहिसर पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी रिक्षात ही तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. दोघांना उपचारासाठी भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिल दांडेकरचा या अपघातात मृत्यू झाला. या तरुणीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या प्रकृतीचा धोका टळल्याचे पोलिसांनी सांगितले. ही तरुणी आणि दांडेकर यांच्यात दूरचे नातेही आहे. त्या दोघांमध्ये वाद होता त्यामुळेच त्याने आधीपासून चाकू आणून ठेवला होता. दहिसर पोलिसांनी दांडेकरला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरोधात तर तरुणीवर हल्ला केल्याप्रकरणी दांडेकरवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 2:18 am

Web Title: lovers accidental death after attacking his girlfriend
Next Stories
1 जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
2 शाळेत बास्केटबॉल खेळताना चिमुरडय़ाचा मृत्यू
3 वीजप्रकल्पांत पाच दिवसांचा कोळसा
Just Now!
X