29 September 2020

News Flash

‘शांतता’ चित्रीकरण सुरू आहे..!

मालिकांच्या सेटवरील गर्दी ओसरली

मालिकांच्या सेटवरील गर्दी ओसरली

मुंबई : कौटुंबिक, ऐतिहासिक मालिका असो वा ‘रिअ‍ॅलिटी शो’चा सेट असो.. या सगळ्याच सेटवर फार नाही अगदी तीनच महिन्यांपूर्वी चित्रीकरण सुरू असताना ६०-७० लोकांची वर्दळ असायची. आता नव्याने चित्रीकरण सुरू करताना या खेळीमेळीची आणि गडबडीची जागा शांततेने घेतली आहे. तीन महिन्यांनंतर सगळ्यांची भेट झाली हा आनंद मनात असला तरी विविध प्रकारची काळजी घेऊन चित्रीकरण सुरू ठेवायचे आहे ही जाणीव सध्या जास्त वरचढ होत असल्याची भावना कलाकार आणि तंत्रज्ञ व्यक्त करताना दिसतात.

मोजकीच वीस-पंचवीस माणसे, तीही एकमेकांपासून अंतर राखून उभी असणारी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याच्या कामाच्या गरजेप्रमाणे असलेल्या मुखपट्टया, अगदी कलाकारांचे चेहरेही मुखपट्टयांआड दडलेले. ते के वळ कॅ मेऱ्यासमोर चित्रीकरण करण्यापुरती बाहेर येतात आणि पुन्हा मुखपट्टीआड लपतात. मानवी भावभावनांमधली सगळ्यात सहज भावना असते ती स्पर्शाची. हा सहजस्पर्शच सध्या सेटवरून हरवला आहे, अशी भावना ‘माझा होशील का’ या मालिके चे निर्माते सुबोध खानोलकर यांनी व्यक्त के ली.

‘गेली तीन-चार वर्ष आम्ही मालिके च्या निमित्ताने एकत्र आहोत. आमचे सगळ्यांचे एक घट्ट नाते आहे, मात्र सध्या सामाजिक अंतराचे नियम पाळायचे आहेत. त्यामुळे कडकडून भेटणं नाही. एकमेकांना साधा हातही लावायचा नाही. शिवाय, आमचा ५०-६० जणांचा                क्रू  होता, आता फक्त वीसजण मिळून काम करतो आहोत. त्यामुळे सेटवर क मालीची शांतता असते ज्याची आम्हाला सवय नाही’, असे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिके चे दिग्दर्शक के दार वैद्य सांगतात. आजवर मुंब़ईतच चित्रित झालेली ही मालिका सध्या नाशिकमध्ये अगदी दूर गावात चित्रित के ली जात आहे. त्यामुळे एरव्ही सेटवर चित्रीकरण बघायला येणाऱ्यांचीही

वर्दळ नाही. उलट, सकाळी आल्या आल्या थर्मल स्क्रीनिंग, मग मुखपट्टी किं वा पीपीई किट घालून चित्रीकरण करायचे या नव्या सवयी अंगी बाणवतो आहोत. मुखपट्टी घालून दिवसभर चित्रीकरण करण्याचाही त्रास होतो, असे वैद्य यांनी सांगितले.

आणखी एक महत्त्वाचा बदल सेटवर झाला आहे तो म्हणजे कलाकार असोत वा तंत्रज्ञ सगळ्यांच्या दैनंदिनीतून बाहेरचे खाणे हा शब्दच नाहीसा झाला आहे. सेटवरच बनवलेले खाणे तेही डाएट फु डवर भर देण्यात येत असून आम्ही तर आरोग्यासाठी आता योग प्रशिक्षणाचे धडेही सेटवर घेण्याचा विचार करत आहोत, असे वैद्य यांनी सांगितले. कलाकारांना सध्या वेशभूषा आणि रंगभूषा स्वत:च करावी लागते आहे. पीपीई किट घालून एखादाच रंगभूषाकार कलाकारांना मदत करताना दिसतो. आजूबाजूला सतत असणारा हा सुरक्षेचा जामानिमा यामुळे कामाचा वेगही कमी झाला आहे आणि कलाकारांना अभिनय करतानाही मर्यादा येत आहेत. प्रत्यक्ष एखादे दृश्य देतानाही सुरक्षित अंतर राखावे लागते. त्यामुळे भिनय करण्याचे आवाहन कलाकारांसमोर असल्याचे ‘मोलकरीणबाई’ मालिके तील अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी सांगितले.

ज्येष्ठ कलाकारांच्या घरी चित्रीकरण

मुंबई : ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरण स्थळी येण्यास मज्जाव करण्यात आल्याने अनेक मराठी-हिंदी मालिके च्या निर्माता-दिग्दर्शकांनी या कलाकारांच्या घरीच चित्रीकरण करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. त्यासाठी कथानकात यथोचित बदलही करण्यात येत आहेत. काही निवडक दृश्ये कलाकारांच्या घरी चित्रित करण्यात येत आहे. स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीणबाई’ या मालिकेतील स्वाती बोलेकर या अभिनेत्री सासूची भूमिका करतात. ‘कथानकात त्यांना महत्त्वाचे स्थान असून, नियमानुसार त्यांना सेटवर मनाई असल्याने आम्ही त्या गावी अथवा बाहेर गेल्याचे संदर्भ वापरत असल्याचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी सांगितले. झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत अच्युत पोतदार आणि ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत रवी पटवर्धन या कलाकारांच्या घरी काही निवडक दृश्यांचे चित्रीकरण करण्यात येत आहे. यासाठी दिग्दर्शक कलाकारांशी संवाद साधत असून कुटुंबीयांना छायाचित्रणाचे धडेही दिले जात आहे.

राज्य शासनाच्या या निर्ण यामुळे काही कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. काही ज्येष्ठ कलाकारांचे घर त्यांच्याच कमाईवर चालते. दुसरे म्हणजे  मालिकेत ६५ पेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना विमा संरक्षण देण्यास निर्मातेही कचरतात, कारण त्याचा हप्ता जास्त असतो.

– प्रदीप वेलणकर, अभिनेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:53 am

Web Title: low crowd on set of the serial due to coronavirus zws 70
Next Stories
1 कोळी महिला ऑनलाइन मासे विक्रीसाठी सज्ज
2 केशकर्तनालयांमध्ये कारागिरांचा तुटवडा
3 मुंबईत करोना मृतांच्या आकडेवारीबाबत गोंधळ?
Just Now!
X