26 January 2021

News Flash

लोअर परळ उड्डाणपुलासाठी मार्च २०२२चा मुहूर्त

आणखी सव्वा वर्ष वाहतूक कोंडीतच

लोअर परळ (रेल्वे स्थानकाला जोडून असलेला) उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२२ उजाडणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी किमान सव्वा वर्ष लागणार आहे. रेल्वे हद्दीतील पुलाचे काम मार्च २०२१ पर्यंत आणि त्यानंतर पालिका हद्दीतील काम पूर्ण होण्यासाठी वर्ष लागेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) आणि अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे, पालिका व आयआयटीने रेल्वे हद्दीतील पादचारी पूल व उड्डाणपुलांचे सुरक्षा ऑडिट केले होते. यात लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी, परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

या पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे आणि पालिका हद्दीतील काम मुंबई पालिकेने करण्याचा निर्णय घेतला. पूल निर्मितीसाठी पायलिंगचे आणि अन्य काम १४ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी रेल्वे हद्दीतील पुलाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण के ले जाणार असल्याचे सांगितले. गर्डर बसवण्याचे काम अद्याप झालेले नाही. ते पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण के ले जाईल. रेल्वे हद्दीतील भाग पूर्ण होताच पालिका हद्दीत असलेल्या पुलाचे दोन्ही भाग मुंबई पालिके कडून के ले जाणार असल्याचे ते म्हणाले. ते काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यासाठी पालिके कडून रेल्वेला निधीही मिळाला आहे.

फेररे उड्डाणपुलाबाबत..

चर्नी रोड आणि ग्राण्ट रोडला जोडणाऱ्या फेररे उड्डाणपुलाचे कामही मे २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. या पुलावर गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. अन्य किरकोळ कामे बाकी असून ती पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या कामांसाठी डिसेंबर महिन्यात निविदा खुली केली जाणार आहे. पालिका हद्दीतीलही पुलाचे काम पूर्ण करण्याचे काम मुंबई पालिकेने रेल्वेलाच दिल्याचे ठाकूर म्हणाले. फेररे उड्डाणपूल १९२१ साली बांधण्यात आला होता. हा पूल धोकादायक घोषित केला होता. या पुलाचे पाडकाम जानेवारी २०२० पासून करण्यात आले होते. त्यानंतर कामाला गती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 3:37 am

Web Title: lower parel flyover traffic congestion mppg 94
Next Stories
1 धमक्या देणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत!
2 मुख्यमंत्र्यांनी भाजपची भाषा आत्मसात केलेली नाही!
3 सुरेंद्र थत्ते यांचे निधन
Just Now!
X