News Flash

‘लकी कंपाऊंड’ प्रकरणातील आरोपी रुग्णालयात

शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील सात मजली अनधिकृत इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला बिल्डर अब्दुल सलीम अजीज सिद्धिकी या

| December 3, 2013 12:45 pm

शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील सात मजली अनधिकृत इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला बिल्डर अब्दुल सलीम अजीज सिद्धिकी या आरोपीची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सोमवारी ठाणे न्यायालयात देण्यात आली. तसेच या प्रकरणातील आरोपी नगरसेवक हिरा पाटील याने न्यायालयीन कोठडीमधून प्रभागाची कामे करण्याची मुभा मागितली असून याबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय राखून ठेवला आहे, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील सात मजली अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७४ जण ठार झाले होते. या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने महापालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, बिल्डर आणि नगरसेवक आदींना अटक केली होती. या प्रकरणातील बिल्डर सिद्धिकी याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी संपली. पण त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले नाही, अशी माहिती न्यायालयात देण्यात आल्याचे सरकारी वकील हिरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 12:45 pm

Web Title: lucky compound case accused hospitalised
Next Stories
1 बनावट प्रवासी एजंटला अटक
2 सामूहिक विकासाची हमी! ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वर मुख्यमंत्र्यांची मोहोर
3 चित्रकला, हस्तकलेचा ‘कार्यानुभव’ का नको?
Just Now!
X