News Flash

‘ल्युडो’ हा खेळ  कौशल्याचा की नशिबाचा?

 हा खेळ पैसे लावून खेळला जात असल्याने त्याला जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : ‘ल्युडो’ हा कौशल्यावर आधारित खेळ नसून नशिबाचा खेळ असून त्याला जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असा दावा करत मोबाइलमध्ये उपलब्ध ‘ल्युडो सुप्रीम अ‍ॅप’विरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. तसेच ‘अ‍ॅप’ची मालकी असलेल्या कं पनीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयानेही या याचिकेत उपस्थित मद्द्याची दखल घेत ‘ल्युडो’ हा कौशल्याचा की नशिबाचा खेळ, त्याला जुगार प्रतिबंधक कायदा लागू होतो का, अशी विचारणा करत राज्य सरकारला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

हा खेळ पैसे लावून खेळला जात असल्याने त्याला जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा खेळ जुगार प्रतिबंध कायद्याच्या कलम ३, ४ आणि ५ नुसार तो गुन्हा ठरत असल्याचा दावा करत या ‘अ‍ॅप’ची मालकी असलेल्या ‘कॅशग्रेल’ या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे देण्याची मागणी मनसे पदाधिकारी केशव मुळे यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सरकारला नोटीस बजावत याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे…

याचिकेनुसार ल्युडोचा डाव हा फासा (डाईस) टाकून त्यावर येणाऱ्या अंकानुसार खेळण्यात येतो. त्यामुळे या खेळाला कौशल्याचा खेळ म्हणता येऊ शकत नाही. शिवाय ‘ल्युडो सुप्रीम अ‍ॅप’च्या माध्यमातूनही हा खेळ पैज लावून खेळला जातो. याप्रकरणी आपण सुरुवातीला गिरगाव पोलिसांत तक्रार नोंदवली. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे महानगरदंडाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र ल्युडो हा कौशल्यावर आधारित खेळ नसल्याचे नमूद करत महानगरदंडाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका करण्यात आल्याचे याचिकाकत्र्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:39 am

Web Title: ludo app petition to the high court gambling prevention act akp 94
Next Stories
1 पालिकेच्या जम्बो करोना रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग!
2 खासगी रुग्णालयांकडे लशीचा ५० टक्के साठा
3 निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक!
Just Now!
X