News Flash

‘…तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष’

मता बॅनर्जी, विरोधक सांगत होते. आम्ही सांगत होतो तेव्हा दिल्लीतील काही मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते

शिवसेनेचे खासदार संजय राऊत. (संग्रहित छायाचित्र)

निवडणुकांमुळे करोना वाढल्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने टिप्पणी केली असून हेच आम्ही अनेक महिने सांगत आहोत. ममता बॅनर्जी, विरोधक सांगत होते. आम्ही सांगत होतो तेव्हा दिल्लीतील काही मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे.  दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी त्यांनी धोरण आखले आहे ते पाहता मद्रास न्यायालयाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील असा विश्वास आहे, असेही राऊत  स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:04 am

Web Title: madras high court has commented on elections and this is what we have been saying for month sanjay raut abn 97
Next Stories
1 वैद्यकीय प्राणवायूच्या योग्य वापराकरिता नियमावली
2 राज्यात २४ तासांत ८९५ करोनाबळी
3 लस उपलब्धतेचे आव्हान!
Just Now!
X