महाविकास आघाडी सरकारने अंधेरी येथील महाकाली लेणी बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे. सुमारे २ हजार वर्षांपूर्वीच्या या लेणी व मंदिराचा टीडीआर बिल्डरला आंदण देण्याचा निर्धार करणाऱ्या ठाकरे सरकारच्या या बेकायदेशीर कृतीचा आज भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाकाली लेणी येथे सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा नेते किरीट सोमैय्या हे देखील उपस्थित होते.

प्रविण दरेकर म्हणाले, “ठाकरे सरकार मुंबई विकायला निघालं आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज झोपडीत राहणाऱ्याला, चाळीत राहणाऱ्याला, गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी येत आहे. त्यांची काळजी नाही या सरकारला नाही, त्यांचा विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतू सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम सरकारकडून सुरु आहे.”

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’

सत्तेत आल्यापासून सरकार मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजपा नेहमी जनतेच्या पाठीशी आहे. म्हणूनच इथल्या नागरिकांवर अन्याय होत असताना आम्ही येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही, असेही दरेकर यावेळी म्हणाले.