06 August 2020

News Flash

पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा बोनस

यंदा दिवाळीनिमित्त पालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांना सरसकट १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

आरोग्य स्वयंसेविकांना पालिकेकडून ४,३०० रुपये भाऊबीज

यंदा दिवाळीनिमित्त पालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांना सरसकट १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त ४,३०० रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या या निर्णयास पालिकेतील सर्वच कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे यंदा संघर्षांविनाच कर्मचाऱ्यांच्या पदरी बोनस पडणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जारी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा करणे अवघड बनू शकते. ही बाब लक्षात घेत पालिकेतील कर्मचारी संघटनांनी यापूर्वीच परदेशी यांना पत्र पाठवून बोनसबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार परदेशी यांनी बुधवारी पालिका कर्मचाऱ्यांना सरसकट १५ हजार रुपये बोनस देण्याबाबत परिपत्रक जारी केले. गेल्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना बोनसपोटी १४ हजार ५०० रुपये मिळाले होते. यंदा त्यात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पालिकेच्या कुटुंब नियोजन योजनेपासून साथीच्या आजारांच्या निर्मूलनापर्यंत विविध कामात हातभार लावून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त ४,३०० रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. म्युनिसिपल मजदूर संघटनेने कर्मचाऱ्यांना सुमारे ४० हजार रुपये, तर दि म्युनिसिपल युनियनने वार्षिक वेतनाच्या २० टक्के बोनस देण्याची मागणी केली होती. मात्र आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केलेल्या १५ हजार रुपये बोनसला सर्वच कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:39 am

Web Title: mahapalika employee bonus akp 94
Next Stories
1 मुंबई-पुणे डेक्कन क्वीनच्या ‘डायनिंग कार’ला नवीन साज
2 आठ महिन्यांच्या बालिकेवर यकृत प्रत्यारोपण
3 ‘आरे वाचवा’साठी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर निदर्शने
Just Now!
X