24 October 2020

News Flash

पालिकेचे दवाखाने  सकाळी ८ वाजल्यापासून खुले

दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांवर उपचार केले जातात.

 

नोकरदार रुग्णांच्या सोयीसाठी पालिकेचे १५ दवाखाने रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आपले सर्वच दवाखाने सकाळी ९ च्या ऐवजी ८ वाजता खुले ठेवण्याचा विचार पालिका करीत आहे. गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गरीब कुटुंबातील रुग्णांना स्वस्तात वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने मुंबईत विविध ठिकाणी १८६ दवाखाने सुरू केले आहेत. या दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांवर उपचार केले जातात. कार्यालयात जाणाऱ्या अनेकांना सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत दवाखान्यात जाऊन उपचार घेता येत नाहीत. तसेच खासगी दवाखान्यात उपचार घेणे त्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला. मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे प्रशासनाने निवडक १५ दवाखाने कंत्राटदारामार्फत दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवण्यात येणार आहेत. मात्र त्यामुळे मोजक्याच रुग्णांना लाभ होणार आहे. त्यामुळे सर्वच दवाखाने सकाळी ९ ऐवजी ८ वाजताच खुले करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. त्यांनी आणलेल्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारीपासून पालिकेचे सर्व दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून सुरू राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:04 am

Web Title: mahapalika hospital open in morning akp 94
Next Stories
1 मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
2 टॅक्सीनंतर रिक्षाच्या मीटरमध्ये गडबड; काय सांगतायत नितीन नांदगावकर ?
3 मुंबई-पुणे हायपर-लूप प्रकल्प : रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Just Now!
X