नद्या, उपनद्या, तलाव आणि खाडय़ांच्या परिसरातील बांधकामाबाबत सर्वसमावेशक योजना जाहीर करण्याचे निर्देश देताना त्यासंदर्भात तीन आठवडय़ात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. ‘वनशक्ती’ या संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.
नद्या, उपनद्या, तलाव, खाडय़ांच्या १०० मीटर परिसरात बांधकामांना मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. नद्या, उपनद्या, तलाव, खांडय़ाच्या १०० मीटर परिसरात सर्रास बांधकामे केली जात असून या नद्यांचा मार्ग बदलत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.