News Flash

Maharashtra Assembly floor test : उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा होती.

(संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा असणार होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले. सरकारला १६९ आमदारांनी समर्थन दिले, तर ४ आमदार तटस्थ राहिले. भाजपाच्या सर्व आमदारांनी यावेळी सभात्याग केल्याने विरोधात शून्य मतदान झाले.

Live Blog
Highlights
  • 14:56 (IST)

    महाविकास आघाडीच्या सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

    महाविकास आघाडीच्या सरकारला १६९ आमदारांनी सभागृहात समर्थन दर्शवल्याने उद्धव ठाकरे सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ही ही घोषणा केली. यावेळी ४ आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. तर भाजपाच्या सर्व आमदारांनी सभागृहाचा त्याग केल्याने शून्य आमदारांनी याला विरोध केला असे वळसे-पाटील यांनी जाहीर केली.

    https://platform.twitter.com/widgets.js

17:05 (IST)30 Nov 2019
अशा फरकाने जिंकला विश्वासदर्शक ठराव

15:10 (IST)30 Nov 2019
उद्धव ठाकरे राजकारणातील हरिश्चंद्र - बच्चू कडू

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला राज्यातील सत्तेचा खेळ आज संपला. उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो, या शब्दाला जागणारे उद्धव ठाकरे यांचे मी अभिनंदन करतो, असे यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.

15:06 (IST)30 Nov 2019
महाराष्ट्राच्या भूमीचा अभिमान - अबू आझमी

महाराष्ट्राच्या भूमीचा आम्हाला अभिमान असून देशातील सर्व राज्यांचे लोक इकडे पोटापाण्यासाठी येतात. त्यामुळे सर्व समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद राहिल याची सरकारने काळजी घ्यावी. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंच्या सरकारला शुभेच्छा देतो, असे यावेळी अबू आझमी म्हणाले.

15:02 (IST)30 Nov 2019
विरोधी पक्ष नेता दर्जेदार असावा अशी आमची अपेक्षा - जयंत पाटील

विश्वासदर्शक ठरावापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करणारे मुद्दे मांडले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्हाला  दर्जेदार विरोधी पक्ष नेता असावा असे यावाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. आपले जे दैवत आहे त्यांचे नाव जर मंत्र्यांनी शपथ घेण्यापूर्वी घेतले तर काय बिघडलं, असे ही ते यावेळी म्हणाले.

14:56 (IST)30 Nov 2019
महाविकास आघाडीच्या सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

महाविकास आघाडीच्या सरकारला १६९ आमदारांनी सभागृहात समर्थन दर्शवल्याने उद्धव ठाकरे सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ही ही घोषणा केली. यावेळी ४ आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. तर भाजपाच्या सर्व आमदारांनी सभागृहाचा त्याग केल्याने शून्य आमदारांनी याला विरोध केला असे वळसे-पाटील यांनी जाहीर केली.

https://platform.twitter.com/widgets.js

14:37 (IST)30 Nov 2019
भाजपाचा सभात्याग

विश्वासदर्शक ठरावाची चाचणी सभागृहात सुरु असताना भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. 

https://platform.twitter.com/widgets.js

14:37 (IST)30 Nov 2019
आवाजी मतदानानंतर शिरगणती सुुरु

अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर याबाबत दिलीप वळसे-पाटील यांनी आपली मतं मांडण्यास सांगितल्यानंतर सरकारच्या समर्थक आमदारांनी आवाजी मतदानाने आपला पाठींबा दर्शवला. त्यानंतर आवाजी मतदानानंतर शिरगणती सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुणीही बाहेर जाऊ नये यासाठी सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले.

14:32 (IST)30 Nov 2019
अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला

काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. याला राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले.

https://platform.twitter.com/widgets.js

14:27 (IST)30 Nov 2019
राज्यापालांनी माझी निवड केली, त्यामुळे हे कायदेशीरच - वळसे-पाटील

विधानसभेचा हंगामी अध्यपद बदलाची घटना सभागृहात घडलेली नाही. याचा सभागृहात निर्णय झालेला नाही त्यामुळे यावर चर्चा नको. राज्यापालांच्या आदेशाने माझी हंगामी अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यामुळे ही कायदेशीरच आहे.

14:24 (IST)30 Nov 2019
देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष बदलल्याची घटना नाही - फडणवीस

एक हंगामी अध्यक्ष हटवून दुसरे अध्यक्ष बदलल्याची घटना देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती. त्यामुळे सरकारला अध्यक्ष का बदलावा लागला. संविधानाची पायमल्ली होत आहे. हंगामी अध्यक्ष झाल्यानंतर आजवर विश्वासमताचा प्रस्ताव आला नाही. तुम्हाला कसली भीती होती. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झालं तर आपला विश्वास दर्शक ठराव मंजूर होणार नाही. याची भीती तुम्हाला होती. त्यामुळेच सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले.

https://platform.twitter.com/widgets.js

14:20 (IST)30 Nov 2019
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीही नियमबाह्य - फडणवीस

राज्यापालांनी मी म्हटल्यानंतर ठराविक नमुन्यातच शपथ घेतल्यास ती शपथ घेतली तरच ग्राह्य असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचीही शपथ चुकली होती तेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी शपथ घ्यावी लागली होती. त्यामुळे शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ ही नियमबाह्य होती.

14:14 (IST)30 Nov 2019
दादागिरी नही चलेगी; भाजप आमदारांची घोषणाबाजी

देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनावर घेतलेले आक्षेप विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्यानंतर भाजपाच्या आमदारांकडून सभागृहात 'दादागिरी नही चलेगी' अशा घोषणा देण्यात आल्या.

14:10 (IST)30 Nov 2019
फडणवीसांचा आक्षेप अध्यक्षांनी फेटाळला

राज्यापलांनी हे अधिवेशन रद्द केलेलं नव्हतं त्यामुळे सात दिवसांत ते पुन्हा घेता येतं. मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर राज्यापालांनी याला परवानगी दिली. त्यामुळे हे अधिवेशन पूर्णपणे नियमानुसारच होत आहे. त्यामुळे तुमचा दावा फेटाळून लावतो, असे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

14:04 (IST)30 Nov 2019
हे अधिवेशन नियमबाह्य - फडणवीस

२७ नोव्हेंबरला जे अधिवेशन झालं होत. त्याची प्रत देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवलं. राष्ट्रगीतही त्यावेळी झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हे अधिवेशन त्यावेळस संपल्याचे त्यांनी सांगितलं. त्यामुळे हे अधिवेशन नियमाला धरुन नाही, असा दावा त्यांनी केला.

https://platform.twitter.com/widgets.js

14:02 (IST)30 Nov 2019
वळसे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुुरु

हंगामी विधानसभा अध्यक्ष वळसे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली कामकाजाला सुरुवात

13:59 (IST)30 Nov 2019
सुप्रिया सुळे विधीमंडळात दाखल

मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रीया सुळे या विधानसभेच्या गॅलरीत बसून बहुमतचाचणी पाहणार आहेत.

Shiv Sena and NCP issue whip to their MLAs directing them to be present in the Assembly today. #Maharashtra

— ANI (@ANI) November 30, 201

https://platform.twitter.com/widgets.js

13:58 (IST)30 Nov 2019
शिवसेना, राष्ट्रवादीकडून व्हीप जारी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना बहुमतचाचणीसाठी सभागृहात हजर राहण्याासाठी व्हीप जाहीर केला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

13:57 (IST)30 Nov 2019
महाविकास आघाडीच्या बहुमतचाचणीसाठी देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल

महाविकास आघाडीच्या बहुमतचाचणीसाठी देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल झाले आहेत. 

https://platform.twitter.com/widgets.js

13:55 (IST)30 Nov 2019
काँग्रेसकडून व्हीप जारी
https://platform.twitter.com/widgets.js
Next Stories
1 व्हीप म्हणजे काय? तो का काढतात?; जाणून घ्या
2 आम्ही फोडाफोडी केली तर अख्खं भाजपा रिकामं होईल – नवाब मलिक
3 महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर : चंद्रकांत पाटील
Just Now!
X