News Flash

Maharashtra budget 2017 : शेतकरी-ग्रामीण विकासाचा संकल्प, पण कर्जमाफीच नाहीच

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

Maharashtra Budget 2017 : अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

कर्जमुक्तीसाठी मोठी तरतूद करणे अशक्य असले तरी बळीराजाला बळ देण्याचे आव्हान पेलत कृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविणारा आणि नवीन घोषणांऐवजी करेतर महसूल वाढविण्यावर भर देणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे. नोटाबंदीचा फटका बसून अपेक्षित उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट गाठता न आल्याने वित्तीय तूट मर्यादेत ठेवण्यासाठी कसरत करतानाच सातव्या वेतन आयोगाचा मोठा आर्थिक बोजा पुढील आर्थिक वर्षांत पडणार आहे. आर्थिक चणचणीमुळे नवीन योजनांच्या घोषणांवर फारसा भर दिला जाणार नाही. पुढील आर्थिक वर्षांत वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलात येत असल्याने करेतर महसूलवाढीचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह स्मारकांसाठी भरीव तरतुदी करण्यात येतील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर विधानपरिषदेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करतील.

दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा सन २०१६-१७चा आर्थिक पाहणी अहवाल मांडला होता. यामध्ये सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षी राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे धान्य उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे म्हटले होते. यंदा उसाच्या उत्पादनात २८ टक्क्यांची घट अपेक्षित असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत तृणधान्य, कडधान्य आणि कापसाच्या उत्पादनात ८० ते १७८ टक्यांपर्यंत विक्रमी वाढ होण्याची अपेक्षा आहे. परिणामी कृषी आणि कृषिपूरक उद्योगांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल १२.५ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आल्याने शेती उद्योगाला खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आले होते.

Live updates :

४.०० अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे भाषण संपले
३.५७ कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वाईप मशीन स्वस्त करणार- मुनगंटीवार
३.५४ जीएसटी येईपर्यंत धणे, ओले खजूर, आमसूल, हळद, मिरची, चिंच, लिंबू, गहू , तांदळावरील कर माफ- मुनगंटीवार
३.५१ माती परीक्षण यंत्र आणि दूध तपासणी यंत्र स्वस्त होणार- मुनगंटीवार
३.५० मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यान्वित केलेल्या प्रकल्पांसाठी १७ कोटी ३२ लक्ष रु. निधीची तरतूद- मुनगंटीवार
३.४५
पोलीस, रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलासाठी ११२ हा एकच टोल फ्रि नंबर असेल- मुनगंटीवार
३.४० कारखान्यांचा ऊस खरेदी कर माफ होणार- मुनगंटीवार
३.३५ देशी आणि विदेशी दारू महागणार- मुनगंटीवार
३.३१ देशी व विदेशी मद्यावरील, लॉटरी वगळता कोणत्याही वस्तूवर करवाढ प्रस्तावित करत नाही- मुनगंटीवार
३.३०ऑनलाईनसह पेपर लॉटरी महागणार- मुनगंटीवार
३.२५ सार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस करणार- मुनगंटीवार
३.२४:
राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मानस- मुनगंटीवार
३.२३:
राज्यातील शासकीय इमारती २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव- मुनगंटीवार
३.२२:
नवी-मुंबई, मीरा-भाईंदर, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये सीसीटीव्ही बसवणार- मुनगंटीवार
३.२१:रस्ते अपघात टाळण्यासाठी यांत्रिकीकरण सुविधांसाठी ३४ कोटींची तरतूद
३.२०:न्याययंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी १०१४ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
३.१९:मुंबईत स्कूल ऑफ ड्रामा सुरू करणार- मुनगंटीवार
३.१८:पोलीसांच्या घरांसाठी ३२५ कोटींची तरतूद- मुनगंटीवार

३.१७: १० ते ४० लाखांपर्यंत स्मार्ट ग्राम योजनेला बक्षीस देणार- मुनगंटीवार
३.१६: पंढरपूरच्या विकाससाठी निर्मलवारी योजनेतंर्गत ३ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
३.१५: छत्रपती शिवाजी महाराज, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे व अन्य स्मारकांच्या उभारणीसाठी २०० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
३.१४: सिंधूदुर्ग, रायगड किल्ला आणि लोणार सरोवराचा विकास करणार- मुनगंटीवार
३.१३: तालुक्यांमध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी १०० कोटी- मुनगंटीवार

३.१२: महिला आयोगासाठी ७ कोटी ९४ लाखांचा निधी उपलब्ध केला जाईल – मुनगंटीवार
३.११ अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्यासाठी ३१० कोटी ५७ लाख- मुनगंटीवार
३.१० व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ८ कोटी- मुनगंटीवार
३.०९गावागावातील पर्यावरण विषयक योजनांसाठी २० कोटी- मुनगंटीवार
३.०८ दारिद्र्य निर्मुलनासाठी १३३ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
३.०७ पेंच, नागझिरा, नवेगाव अशा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ८० कोटी तरतूद- मुनगंटीवार
३.०६ वन्य प्राण्यांचा पिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी योजना, २५ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
३.०५ १०० टक्के कुटुंबांना गॅस सिलिंडर देणार- मुनगंटीवार
३.०२ राज्यातील अल्पसंख्याक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी १२५ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
३.०१ ओबीसी मंत्रालयासाठी २३८४ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
३.०० राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानासाठी २११ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.५९ स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी १६०५ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.५८व्याघ्र प्रकल्पांसाठी ८० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.५७ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाइन्फ्रा ही संस्था स्थापन केली जाणार – सुधीर मुनगंटीवार
२.५६ राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे-पाटलांची नार्को टेस्ट केली, तर ते विरोधकांसोबत नाहीत, हे कळेल – सुधीर मुनगंटीवार
२.५५ शासकीय आणि वैद्यकीय बांधकामांच्या बळकटीकरणासाठी ५५९ कोटींची तरतूद- मुनगंटीवार

२.५४ शासकीय आणि वैद्यकीय बांधकामांच्या बळकटीकरणासाठी ५५९ कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.५३ नगरपालिकांच्या विकासासाठी ११०० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.५२औरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ बांधणार- मुनगंटीवार
२.५१ बंदर जोडणी प्रकल्पाला चालना देण्यासाठी ७० कोटी- मुनगंटीवार
२.५० मिहान विमानतळासाठी १०० कोटी- मुनगंटीवार
२.४९ मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी ७०० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.४८
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत शहरी भागात २ लाख घरांचे बांधकाम करण्यास सुरूवात करणार- मुनगंटीवार
२.४७:
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत १६३० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.४६
महाराष्ट्रातील ३ रेल्वे प्रकल्पांसाठी १५० कोटींची तरतूद – मुनगंटीवार
२.४५
राज्यात वीज-पाणी वाचवण्यासाठी ग्रीन इमारतींच्या निर्मितीवर भर- मुनगंटीवार
२.४४
सोलापूर, चंद्रपूर, अमरावती विमानतळांच्या विकासासाठी ५० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.४३
१० हजार किलोमीटरचे रस्ते पुढील दोन वर्षात बांधणार- मुनगंटीवार
२.४२
३० हजार कोटींची १९५ कामे प्रस्तावित, ३ हजार कोटीची मदत लगेच देणार- मुनगंटीवार
२.४२
मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाला २५ कोटीचा निधी देणार- मुनगंटीवार
२.४१
पंतप्रधान सडक योजनेतंर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५७० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.४०
चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा उभारणार; टप्प्याटप्याने २०० कोटींची तरतूद- मुनगंटीवार
२.३९ 
रस्ते बांधकाम आणि सुधारणेसाठी ७००० कोटी रूपये निधीची तरतूद- मुनगंटीवार
२.३८
मराठवाड्यातील चार हजार गावात, विदर्भातील १०० गावांमध्ये शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प- मुनगंटीवार
२.३७
३५ उद्योग समूहांबरोबर सामंजस्य करार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणार – मुनगंटीवार
२.३६
मराठवाड्यातील कृष्णा खोरे प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करणार- मुनगंटीवार
२.३५
गवंडी कामगारांना प्रशिक्षित करणार, १० हजार गवंडी कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार
२.३४
पेठ, यवतमाळ, नाशिकमध्ये कृषी महाविद्यालये उभारणार- मुनगंटीवार

२.३३ पेठ, यवतमाळ, नाशिकमध्ये कृषी महाविद्यालये उभारणार- मुनगंटीवार
२.३२ प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेतंर्गत १, ९७० केंद्रांमार्फत कोटी १ लाख २२ हजार गरजू तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार- मुनगंटीवार
२.३१ प्रत्येक हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील- मुनगंटीवार
२.३० १८ ते ३० वयोगटातील २५ टक्के तरूणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक- मुनगंटीवार
२.२९ थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहणार
२.२८ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर २९,६२१ रूपयांचं कर्ज आहे- मुनगंटीवार
२.२७ कृषी पंपासाठी ७९ कोटीची तरतूद- मुनगंटीवार
२.२६अवर्षणग्रस्त भागात ४ वर्षात प्रकल्प राबवणार- मुनगंटीवार
२.२५ अॅग्रो मार्केटसाठी ५० लाखांची तरतूद- मुनगंटीवार
२.२४ जलयुक्त शिवारमधून दरवर्षी पाच हजार गावे पाणीटंचाईमुक्त करणार- सुधीर मुनगंटीवार
२.२३
शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करू देण्यासाठी ५० कोटींची तरतूद- सुधीर मुनगंटीवार
२.२२
योग्य भाव मिळवून देण्यासाठी पणनमार्फे गोडाऊनची व्यवस्था करून देणार- सुधीर मुनगंटीवार
२.२१
कोकणातील काजू लागवडीच्या प्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करून देणार
२.२० मागेल त्याला शेततळे योजनेसाठी २२५ कोटींची योजना- सुधीर मुनगंटीवार
२.१९ सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणार- सुधीर मुनगंटीवार
२.१८  ५ लक्ष ५६ हजार सेक्टर क्षेत्रावर जलसिंचन होणार- सुधीर मुनगंटीवार
२.१७ जलशिवार योजनेसाठी १ हजार २०० कोटींची तरतूद- सुधीर मुनगंटीवार
२.१६ गेल्या दोन वर्षांत जलसंपदा विभागासाठी ८,२३३ कोटींची तरतूद , पूर्ण निधीचे वाटप- मुनगंटीवार
२.१५
शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप- शिवसेना सरकार कटिबद्ध- मुनगंटीवार
२.१३
खासगी सावकरांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ११२४ कोटी- मुनगंटीवार
२.१२  
ईश्वरा सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना पुढचा अर्थसंकल्प ऐकण्यासाठी सभागृहात निवडून देऊ नका- मुनगंटीवार
२.१० 
विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ
२.०५
यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा देऊ- मुनगंटीवार
२.००
विरोधकांच्या गोंधळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून अर्थसंकल्प मांडायला सुरूवात
१. २५ :
थोड्याचवेळात अर्थसंकल्प सादर होणार
१. २० :
संसदीय कार्यपद्धतीमध्ये चुकीची प्रथा पडू नये म्हणून आम्ही अर्थसंकल्प ऐकून घेणार आहोत- शिवसेना
 १.१५: शिवसेना विधानसभेत शांत बसून अर्थसंकल्प ऐकणार
 १.००: शिवसेना बॅकफुटवर, अर्थसंकल्प मांडू देणार
१२.४५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनात विरोधकांचा प्रचंड गोंधळ, निवेदनानंतर विधानसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब
१२.३२: कर्ज माफीवर केंद्राकडून स्पष्ट आश्वासन नाही, पण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याची केंद्राची तयारी – मुख्यमंत्री फडणवीस
११.१०: ‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो’… विधानभवन परिसरात विरोधकांच्या घोषणा
१०.५५: ‘आले रे आले… दिल्लीवरून हात हलवत आले’च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला
१०.५३: शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:24 pm

Web Title: maharashtra budget 2017 live updates devendra fadnavis farmers loan waiver bjp shivsena congress dhananjay munde
Next Stories
1 Maharashtra Budget 2017: कर्जमाफीवर शिवसेनेचे वाघ शांत कसे झाले?: धनंजय मुंडे
2 केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- राधाकृष्ण विखे पाटील
3 धारावीत एटीएम कॅश लुटणाऱ्या तिघांना साताऱ्यात पकडले
Just Now!
X