20 October 2020

News Flash

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार करोना पॉझिटिव्ह

संजय कुमार हे सध्या होम क्वारंटाइन

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार हे करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.करोनाचा शिरकाव राज्याच्या मंत्रिमंडळातही वेगाने झाला आहे. तर राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संजय कुमार यांना करोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी करोना चाचणी केली. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मागील आठवड्यात २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला संजय कुमार हजर होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी संजय कुमार यांना सौम्य लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी करोना चाचणी करुन घेतली. ज्यानंतर त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात करोनाचं थैमान वाढताना दिसतं आहे. लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. दरम्यान संजय कुमार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंत्रालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे.

जून महिन्यात संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. करोना नियंत्रणासाठी ते मागील काही महिन्यांपासून नेटाने प्रयत्न करत होते. तसेच राज्यातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या बॅचचे आहेत. ३६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 4:12 pm

Web Title: maharashtra chief secretary sanjay kumar is tested covid 19 positive he is home quarantined now scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 “सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय काय निकाल देणार याची आम्हालाही प्रतीक्षा”
2 त्या आम्ही नव्हेच! ड्रग्ज सोडा, सिगारेट पण ओढत नाही
3 पडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र
Just Now!
X