News Flash

विजयदादांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये – देवेंद्र फडणवीस

विजयदादांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते-पाटीलही मनाने भाजपामध्येच आहेत.

संग्रहित छायाचित्र

विजयदादांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते-पाटीलही मनाने भाजपामध्येच आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजितसिंहाच्या पक्षप्रवेशाच्यावेळी म्हणाले. माढामध्ये भाजपाचा खासदान निवडून येईल. मोहिते-पाटील घराण्याचा मान भाजपामध्ये कधीही कमी होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिला.

मोहिते-पाटलांशिवाय राजकारण अपूर्ण आहे. रणजितसिंहांमुळे मोठं घराणं भाजपामध्ये आलं आहे. मोहिते-पाटलांच्या मनातील योजना मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. भाजपा हा पक्ष नाही परिवार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण सर्व मिळून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवू व शेवटच्या शेतकऱ्याचा विकास घडवू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह यांनी प्रवेश केला त्यावेळी भाजपाची बडी नेतेमंडळी गरवारे सभागृहात उपस्थित होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपा अजून बळकट होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 2:25 pm

Web Title: maharashtra cm devendra fadanvis praises mohite patil family
Next Stories
1 होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा संताप; मांडवी एक्सप्रेसला तीन तास उशीर
2 सोलापूरात राष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपामध्ये प्रवेश
3 एकता कपूरचा पाठलाग करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक
Just Now!
X