मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा वैमानिकाच्या गलथानपणाला सामोर जावे लागले आहे. हेलिकॉप्टरच्या संभाव्य दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत. अलिबाग येथील आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि पिएनपी नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुंबईला परत जात असताना ही घटना घडली आहे.

अलिबाग येथील कार्यक्रम आटोपुन मुख्यमंत्री मुंबईला परत जाण्यासाठी निघाले होते. दुपारी दोनच्या समुमारास डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या हेलिपॅडवरून त्यांचे हेलिकॉप्टर उडणार होते. नियोजित ठरलेल्या वेळे नुसार मुख्यमंत्री हेलिपॅडवर दाखल झाले होते. मात्र ते बसण्यापुर्वीच हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेण्यास सुरुवात केली. सदर बाब मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली आणि ते हेलिकॉप्टरपासून तातडीने दुर गेले. त्यामुळे पुढील अनर्थ ठळला. यानंतर अचानक उडालेल्या हेलिकॉप्टरला वैमानिकाने पुन्हा खाली उतरवले. यानंतर हेलिकॉप्टरची सुरक्षा तपासणी करण्यात आली. याच हेलिकॉप्टर मध्ये बसून मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या २५ मे रोजी लातुरहून मुंबईकडे येतांना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला होता. यात ते थोडक्यात बचावले होते. सदर अपघात वैमानिकाच्या चुकीने झाल्याचे निष्पन्न झाले होते. आजा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना वैमानिकांच्या गलथानपणाला सामोर जावे लागले. प्रसंगावधान दाखवले नसते तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाने असा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला नसून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, मुख्यमंत्री सुरक्षित आहेत असा खुलासा केला आहे. मात्र मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापुर्वी सदर घटना घडल्याचे जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर आणि पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री येण्यापुर्वीच हेलिकॉप्टर सुरु कसे झाले, ते हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापुर्वीच ते कसे उडाले, सहवैमानिकाने मुख्यमंत्री सर्व प्रवासी बसल्याची खात्री का नाही केली, यासारखे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.