आता परीक्षा ऑनलाइन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन

मुंबई : शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञप्ती) परीक्षा देण्यासाठी आता वाहनचालकाला आरटीओत येण्याची गरज लागणार नाही. घरातूनच ही परीक्षा परिवहनच्या संकेतस्थळावरून देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक जोडावा लागणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. या नवीन सुविधेचे तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

परीक्षार्थीना शिकाऊ लायसन्सची घरातूनच परीक्षा देण्यासाठी स्र्ं१्र५ंँंल्ल.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर जावे लागेल. आधार क्रमांक जोडून पुढील ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी सज्ज व्हाल. साधारण १५ प्रश्न परीक्षेसाठी असतील. यात किमान ९ प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे गरजेचे आहे. साधारण १५० सेकंदात ही परीक्षा द्यावी लागेल, अशी माहिती परिवहन विभागाने दिली. परीक्षा पास झाल्यास शिकाऊ लायसन्सची प्रिंट परीक्षार्थी स्वत: काढू शकतो. त्यामुळे चालकाला शिकाऊ लायसन्सची मुदत संपल्यावरच कायमस्वरूपी लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओत यावे लागेल.

राज्यात दरवर्षी १५ लाखांपेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात. तसेच २० लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी वर्षांला १०० कोटी रुपयांचा खर्च होतो. या सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ वाचणार आहे. तसेच हे काम करणाऱ्या अंदाजे २०० मोटर वाहन निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळेल.

नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करा

भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देणे शक्य आहे, त्या उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

वाहन नोंदणी वितरकांमार्फत

नवीन खासगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाइन पद्धतीने करता येईल, या सेवेचाही शुभारंभ करण्यात आला. नवीन वाहन नोंदणीकरिता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येत होती. आता अशा पद्धतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली असून, यापुढे नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावर तत्काळ नोंदणी होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट)चा उपयोग करून ई स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील. त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे.

परीक्षा कशी द्याल

’ परिवहनच्या संके तस्थळावर जाऊन लर्निग लायसन्स या प्रकारात प्रवेश करावा लागेल. त्यानंतर अर्ज करावा लागेल. त्यासाठी आधार क्रमांक जोडावा लागणार.

’ आधार क्रमांक जोडल्यानंतर त्वरित एक ओटीपी क्रमांक येईल. हा क्रमांक नमूद के ल्यानंतर पुढे नाव, पत्ता अशी सर्व माहिती उपलब्ध होईल.

’  ही प्रक्रि या पार पाडताच त्वरित ऑनलाइन शुल्क अदा करावे लागेल. शुल्क अदा के ल्याचा संदेश येईल.

’ त्यानंतर परीक्षा देण्यासाठी एक पासवर्ड येईल व तो नमूद करून परीक्षेसाठी सज्ज व्हाल.

’ परीक्षा देण्याआधी वाहनाशी संबंधित एक व्हिडीओ याच सकेतस्थळावर असेल. तो पाहावा लागेल.