News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

काही दिवसांपूर्वीच करोना चाचणी आली होती पॉझिटिव्ह

संग्रहित (PTI)

सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. विलगीकरणात असताना रश्मी ठाकरे यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात हलवण्यात आलं. दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रश्मी ठाकरे यांच्याआधी त्यांचे सुपूत्र आणि राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली होती. आदित्य ठाकरेंनी २० मार्चला ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली होती. आदित्य ठाकरेंच्या संपर्कात असल्याने रश्मी ठाकरे यांचीही चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर त्या विलगीकरणात राहत होत्या. पण खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ११ मार्चला करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. दोघांनीही जे जे रुग्णालयात जाऊन करोना प्रतिबंधक लस घेतली होती.

आदित्य ठाकरेंनाही कोरोना
आदित्य ठाकरे यांनी २० मार्चला ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 8:50 am

Web Title: maharashtra cm uddhav thackeray wife rashmi thackeray admitted in hospital sgy 87
Next Stories
1 शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी रुग्णालयामधूनच पोस्ट केला ‘हा’ फोटो
2 शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर असल्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
3 मुंबईतील ४० लाख नागरिकांचे उद्यापासून लसीकरण
Just Now!
X