News Flash

मृत्यूचं थैमान! नालासोपाऱ्यात ७ करोना रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू

नातेवाईकांनी रुग्णालयात घातला गोंधळ

सात रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू. (प्रातिनिधीक छायाचित्र।इंडियन एक्स्प्रेस)

करोना रुग्णसंख्येच्या स्फोटक वाढीचा भार आरोग्य व्यवस्थेला असह्य होत असल्याचं चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी रुग्णांची हेळसांड होत असून, अनेक ठिकाणी रुग्णांना बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेडच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. यातच आता ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

वसई विरारमध्ये दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, सोमवारी ऑक्सिजनअभावी ११ रुग्णांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये ७ रुग्ण ऑक्सिजन न मिळल्याने मरण पावले आहेत. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास रुग्णालयील ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देता आला नाही आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.

आरोग्य व्यवस्थेला भार सोसवेना… रुग्णांची हेळसांड!

प्रचंड वेगानं वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या महानगरांसह सातारा उस्मानाबाद आणि जिल्ह्याच्या ठिकाणीही रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी फरफट होत असून, बेड उपलब्ध नसल्यानं मिळेल त्या जागेवर उपचार केले जात आहेत. साताऱ्यात महिलेवर रिक्षातच उपचार केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. तर उस्मानाबादमध्ये महिलेला बेड उपलब्ध न झाल्याने खुर्चीवरच बसवून उपचार सुरू करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 12:21 pm

Web Title: maharashtra covid 19 situation oxygen shortage seven patients die bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणं केंद्र सरकारला मान्य नसावं”
2 करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी जिल्हा समित्यांचा ३० टक्के निधी
3 चैत्यभूमीजवळील बेकायदा बांधकाम उद्ध्वस्त
Just Now!
X