26 February 2021

News Flash

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“राष्ट्रवादीत सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतील. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होऊन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची तयारी

मुंबई महापालिकेसाठी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण जुळू शकतं का ? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण होऊ नये यासाठी प्रयत्न असेल”.

नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य-
“महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आली. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकरांनी पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणी काय मागणी करावं हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत”.

जीएसटीची २६ हजार कोटींची थकबाकी
जीएसटीची २६ हजार कोटींची थकबाकी आहे. पण दर आठवड्याला पैसे येऊ लागले आहेत अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. अतिवृष्टीग्रस्त आणि अवकाळी पावसांचा फटका बसलेल्यांसाठी केंद्राकडून दिली जाणारी मदत अद्याप मिळाली नसल्याचंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 12:30 pm

Web Title: maharashtra deputy cm ncp ajit pawar on bmc election sgy 87
Next Stories
1 काँग्रेसचं नेतृत्व कोणी करावं?, संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…
2 मुंबई महापालिकेची सोनू सूदवर कारवाईची मागणी; जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
3 “उद्धवा, अजब तुझे सरकार…”; ‘या’ मुद्द्यावरून भाजपाची ठाकरे सरकारवर टीका
Just Now!
X