01 March 2021

News Flash

संपाचा हॉटेल मालकांना फटका

परिस्थिती कायम राहिल्यास चिंता

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भाज्यांऐवजी उसळींवर भर; परिस्थिती कायम राहिल्यास चिंता

मुंबईतील भाज्यांची आवकच घटल्यामुळे दररोज खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना मात्र शेतकरी संपाचा फटका सहन करावा लागला. यामुळे हॉटेलमधील पदार्थाच्या किमतीत वाढ झाली नसली तरी भाज्यांऐवजी जेवणात मोठय़ा प्रमाणावर उसळींवर भर देण्यात येत आहे. तसेच आवक घटलेल्या कोथिंबिरीचा वापर कमी करून या संपाला सामोरे जाण्याची वेळ हॉटेलमालकांवर ओढवली आहे.

मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना बहुतांश भायखळा भाजी मंडईतून भाजी पुरविली जाते. मात्र गुरुवारपासून मंडईतच भाज्यांची पुरेशी आवक न झाल्यामुळे हॉटेलमालकांना ५० टक्केच भाज्यांचा पुरवठा झाला आहे. दादरच्या ‘आस्वाद’ या हॉटेलात  दर दिवशी आस्वादमध्ये १५० कोथिंबीर जुडय़ांची आवश्यकता असते. मात्र शनिवारी केवळ ६० ते ७० जुडय़ा मंडईतून उपलब्ध झाला. सजावटीसाठी कोथिंबीर न वापरता खोबऱ्याचा वापर करण्यात आला, असे ‘आस्वाद’चे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी सांगितले. हीच परिस्थिती छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील ‘आराम’ या हॉटेलमध्ये होती.  भाज्यांची आवक कमी झाल्याचे ‘आराम’चे मालक कौस्तुभ तांबे यांनी सांगितले. शनिवारी भाज्यांचा पुरवठा कमी झाला, असे मुलुंड स्थानकाजवळील एका ‘लंच होम’चे मालक गौतम जैन यांनी सांगितले. भायखळ्यातील ठरावीक विक्रेत्याकडूनच आम्ही भाज्या विकत घेतो. त्यांच्याकडेच माल कमी आल्यामुळे पुरेशा भाज्या उपलब्ध झाल्या नाही. दोन दिवसांपूर्वी बाजरात उरलेल्या भाज्या मिळाल्या.

विश्वासार्हतेचा प्रश्न

ग्राहकांना भाजीऐवजी उसळ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी कडधान्याचा पुरेसा साठा करण्यात आला आहे. भाज्यांच्या किमती वाढल्या म्हणून आम्ही हॉटेलमधील पदार्थाच्या किमतींमध्ये बदल करू शकत नाही, यामध्ये ग्राहकांची विश्वासार्हता असते, असेही जैन यांनी नमूद केले.

संपाच्या काळात नेहमीच हॉटेल व्यावसायिकांना भाजी खरेदी करताना नुकसान सहन करावे लागते. मात्र हा व्यवसाय असल्यामुळे दोन दिवसाच्या संपावर आम्ही पदार्थाचे भाव वाढवत नाही. हा संप जास्त दिवस सुरू राहिला तर मात्र हॉटेल व्यावसायिकांना पर्यायी उत्तर शोधावे लागते.  आदर्श शेट्टी, आहारसंघटनेचे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 3:21 am

Web Title: maharashtra farmers strike affected on hotel part 2
Next Stories
1 राम शिंदे यांच्याकडे ओबीसी खात्याचा कार्यभार
2 मॉलमधून पालेभाज्या गायब, कांद्याचीही आवक बंद
3 रस्ते कामात कुचराई 
Just Now!
X