04 March 2021

News Flash

CCTV : मुंबईत लिफ्टमध्ये अडकल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबईतील धारावी येथे घडली घटना

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईतील धारावी येथे लिफ्टच्या दुर्घटनेत एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लाकडी दरवाजा आणि बाहेरच्या ग्रीलमध्ये अडकल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.

पोलीस आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, मोहम्मद हुजैफा शेख हा पाच वर्षीय मुलगा आपल्या लहान भाऊ-बहिणीसह लिफ्टमधून चालला होता. दरम्यान, तो लिफ्टचा लाकडी दरवाजा आणि बाहेरच्या ग्रीलमध्ये अडकला. त्याच्या भावंडांनी लिफ्टमधील बटन दाबल्याने मोहम्मद अडकलेला असतानाच लिफ्ट वरच्या मजल्याकडे निघाली. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, मोहम्मदला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. धारावीतील पालवाडीच्या कोजी शेल्टर इमारतीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 4:09 pm

Web Title: maharashtra five year old boy crushed to death in dharavi lift aau 85
Next Stories
1 प्रतिबंधित इमारतींच्या संख्येत घट
2 रुग्ण दुपटीचा कालावधी १९६ दिवसांवर
3 करोनाकाळात कुपोषणात वाढ
Just Now!
X