‘लोकसत्ता’ आयोजित ‘महाराष्ट्र गाथा’ वेब व्याख्यानमाला

मुंबई : देशातील अन्य अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वेगळेपण दिसते, ते येथील विचारवंतांच्या योगदानामुळे. नवनवीन संकल्पनांना वाट करून देणाऱ्या अनेक मराठी विचारवंतांनी महाराष्ट्राचा खास विशेष असलेला तर्कवाद जोपासला आणि त्याची मशागतही केली. या तर्कवादाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि त्याचे आजच्या काळातील महत्त्व समजण्यासाठी आज, सोमवारी, १० मे रोजी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेणाऱ्या लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले,

गोपाळ  कृष्ण गोखले, प्रबोधनकार ठाकरे, नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या विचारवंतांनी प्रत्येक संकल्पना तर्कवादाच्या कसोटीवर जोखली. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात तात्त्विक वादांचीही परंपरा निर्माण झाली. वैचारिक सहिष्णुतेमुळे या राज्यातील ही वैचारिक परंपरा अधिक उठून दिसणारी ठरली. या परंपरेतून नेमके काय हाती लागले, त्याचा येथील समाजजीवनावर कोणता परिणाम झाला, या व अशा प्रश्नांची उकल गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानातून होईल.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिअिरग सव्‍‌र्हिसेस, पुणे</p>

http://tiny.cc/LS_Maharashtra_Gaatha  येथे नोंदणी आवश्यक.