News Flash

मालमत्ता करवाढीतून लहान घरांना सूट; अध्यादेश जारी

मुंबईमधील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करवाढीतून पाच वर्षांसाठी सूट देणारा अध्यादेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला. मात्र त्यामुळे पालिकेला ४५० कोटी रुपयांच्या

| June 27, 2015 12:04 pm

मुंबईमधील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करवाढीतून पाच वर्षांसाठी सूट देणारा अध्यादेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला. मात्र त्यामुळे पालिकेला ४५० कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे.
गिरगाव, चिराबाजार, मोहम्मद अली रोड, काळबादेवी, वरळी, पायधुनी, ग्रॅन्ट रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, लालबाग, परळ, शिवडी, दादर, नायगाव, प्रभादेवी आदी परिसरांमधील अनेक चाळींमध्ये ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. या चाळींमधील रहिवाशी मालमत्ता करापोटी नाममात्र रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करीत होते. त्याशिवाय उपनगरांमध्येही ५०० चौरस फुटांपेक्षा लहान १६ लाख घरे आहेत. पालिकेने २०१० मध्ये मालमत्ता कर आकारणीसाठी नवी प्रणाली लागू केल्यानंतर चाळींतील घरांच्या मालमत्ता करात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या वेळी आघाडी सरकारने हस्तक्षेप करून लहान घरांतील रहिवाशांना दिलासा दिला होता. आता २०१५ ते २०२० या कालावधीसाठी मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. या करवाढीच्या कक्षेत ५०० चौरस फुटांपेक्षा लहान घरांचाही समावेश पालिकेने केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2015 12:04 pm

Web Title: maharashtra government announced property tax benefits for small households
Next Stories
1 वांद्रे स्थानकाचे सांस्कृतिक स्थळात रूपांतर
2 बेबी पाटणकरप्रकरणी पोलीस उपायुक्तांचीही चौकशी
3 अवजड वाहने चालवणाऱ्यांना ‘सिम्युलेटर्स’च्या माध्यमातून प्रशिक्षण
Just Now!
X