13 August 2020

News Flash

गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याचे केंद्राला साकडे

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे.

| March 14, 2014 12:02 pm

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ मंत्र्यांचे शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेऊन आचारसंहिता असताना शेतकऱ्यांना कशी मदत करायची आणि केवळ चार महिन्यांचे लेखानुदान मंजूर केले असल्याने मदतीसाठी निधी कुठून उपलब्ध करायचा या दोन प्रश्नांवर चर्चा केली. या दोन्ही प्रश्नांची फक्त केंद्राच्या मदतीनेच सोडवणूक करता येऊ शकेल, अशा निर्णयाप्रत मंत्रिमंडळ आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री व काही वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेण्याचे ठरले. ही भेट शुक्रवारीच होईल.  शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आणि केंद्राकडून निधी मिळावा या दोन मागण्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधानांनाच साकडे घातले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2014 12:02 pm

Web Title: maharashtra government appeal centre help for hailstorm hit farmers
Next Stories
1 संक्षिप्त : लोकलवर पाण्याची पिशवी फेकल्याने महिला जखमी
2 आम आदमी पक्षाच्या कार्यकर्तीवर मुंबईत हल्ला
3 व्हिजेटीआयतर्फे ‘स्पेशल डेज’ साजरे करण्यावर बंदी
Just Now!
X