News Flash

भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभांवर बंदी

राज्य शासनाने त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सभा घेण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. करोना साथरोगाचा धोका लक्षात घेता भीमा कोरेगाव येथे प्रवेश करण्यास तसेच, पुस्तकांसह इतर कोणतेही स्टॉल लावण्यास निर्बंध घालण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

करोनाचा सामना करण्यासाठी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सर्व प्रकारचे धार्मिक उत्सव, कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, आषाढी-कार्तिकी वारी, गणेश उत्सव, नवरात्रोत्सव, ईद आणि ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे गर्दी होऊन त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता १ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव-पेपणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य शासनाने त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादन कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने व प्रतीकात्मक स्वरूपात पार पाडण्यात यावा, असे राज्य शासनाने आवाहन केले आहे.

सूचना काय?

’ महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यांमधूनही अभिवादन कार्यक्रमासाठी पेरणे फाटा येथे येत असतात. करोनाचा धोका लक्षात घेऊन गर्दीवर निर्बंध घालण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

’ सर्व अनुयायांनी पेरणे येथे न येता घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करावे, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. जयस्तंभाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारची सभा घेणे, खाद्यपदार्थ व पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यास मनाई राहणार आहे. त्यासंबंधीची कार्यवाही करण्यास स्थानिक प्रशासनाला सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 3:33 am

Web Title: maharashtra government ban celebrations at jaystambh on january 1 in bhima koregaon zws 70
Next Stories
1 विद्यापीठाचे दुसरे सत्र जानेवारीपासून; उन्हाळी सुट्टी केवळ १३ दिवसांचीच
2 ‘टीआरपी’ विश्लेषणाच्या पद्धतीतच बदल
3 राष्ट्रीय उद्यानात आज नवीन वाघाचे आगमन
Just Now!
X