News Flash

सीएसएमटी-ठाणे भुयारी मार्गाची राज्य सरकारकडून चाचपणी

सध्या सीएसएमटी ते ठाणे जलद रेल्वे प्रवासासाठी ४० ते ४५ मिनिटांचा अवधी लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

एमएमआरडीए, ठाणे महापालिकेकडून अभिप्राय

मुंबई : सीएसएमटी-ठाणे दरम्यान भुयारी रेल्वे मार्गाकरिता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) पाठविलेल्या प्रस्तावावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. सरकारने या प्रकल्पाबाबत  एमएमआरडीए आणि ठाणे पालिकेकडून अभिप्राय, सूचना मागविल्या आहेत. तसेच, हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवणार याबाबत एमआरव्हीसीकडेही विचारणा केली आहे.

सध्या सीएसएमटी ते ठाणे जलद रेल्वे प्रवासासाठी ४० ते ४५ मिनिटांचा अवधी लागतो. हा अवधी कमी व्हावा यासाठी या मार्गावर ३३ किलोमीटरचा भुयारी रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रस्ताव एमआरव्हीसीने बनवला आहे. लोकलमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता संपली असून नवीन मार्ग म्हणून मुंबईला भूमिगत रेल्वेचा पर्याय निवडावा, असे कोकण रेल्वेचे जनक आणि मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी रेल्वे मंत्रालयाला सुचविले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने एमआरव्हीसीला विचारणा केली. त्यानुसार एमआरव्हीसीने दिल्ली मेट्रो रेल कॉपरेरेशनच्या मदतीने मध्य रेल्वेवरील भूमिगत रेल्वेचे सव्‍‌र्हेक्षण केले आणि एमआरव्हीसीला अहवाल सादर केला. त्यावर एमआरव्हीसीनेही अभ्यास करुन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी काही महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठवला होता.

यासंदर्भात  प्रधान सचिव नितीन करीर (नगरविकास-१) यांनी एमआरव्हीसीकडून मंजुरीसाठी प्रस्ताव आल्याचे सांगितले. भविष्यात मेट्रो प्रकल्प होणार असून त्या प्रकल्पांवर परिणाम होऊ शकतो का याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए, ठाणे पालिकेकडूनही अभिप्राय मागविले आहेत. पालिकेच्या कोणत्याही कामांमध्येही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल का हे पाहिले जाणार आहे. प्रकल्पाचा खर्च १७ हजार कोटी असून तो सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर राबवणार की अन्य प्रकारे याचीही विचारणा एमआरव्हीसीला केल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे, निती आयोग यांकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल.

भुयारी मार्ग कसा असेल?

* भुयारी रेल्वे स्थानक सीएसएमटीच्या १८ नंबर स्थानकाबाहेरील पी. डीमोलो मार्ग येथून सुरू होईल. तो मध्य रेल्वेच्या सध्याच्या मार्गाला समांतरच असणार आहे.

* प्रकल्पानुसार नऊ डब्यांच्या वातानुकूलित लोकल या मार्गावर चालविण्याचा विचार आहे. तर चार मिनिटानंतर एक लोकल सोडली जाईल.

*  सीएसएमटी, दादर (मध्य रेल्वे), कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे ही स्थानके भुयारी रेल्वे मार्गावर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 3:53 am

Web Title: maharashtra government evaluation csmt thane underground corridor zws 70
Next Stories
1 शिवसेनेपेक्षा  राष्ट्रवादीच बरी! भास्कर जाधव यांची भावना
2 अजित पवारांनीही ‘ते’ दालन टाळले
3 थर्टीफर्स्टसाठी रात्री बाहेर पडताय…मुंबईकरांसाठी आहेत विशेष गाड्या
Just Now!
X