पुणे -मुंबई महार्गावर घाटात कोळणाऱ्या दरडींची पूर्व कल्पना मिळावी, जेणेकरून पुढील संभाव्य दुर्गटना टाळता येतील, यासाठी या दरडींवर सेन्सर बसविण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे एकदी दरड कोसळण्याच्या किंचित जरी हालचाली सुरू झाल्या तरी त्याचा संदेश त्वरित एमएसआरडीसीला मिळणार असल्याने पुढील धोका टाळता येईल. त्याचप्रमाणे आडोशी आणि खंडाळा बोगद्याचा विस्तारही करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गवरील दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उडाली आहे. रविवारी दोन्ही विभागाच्या मंत्र्यांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर तसेच जिओलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ  इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केलेलया पाहणीनंतर सार्वजनिक बांधकाममंत्री( सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेलया एमएसआरडीसीच्या उच्चस्तरीय बैठकीत ज्या ठिकाणी दरडी कोसण्याचा धोका आहे, त्या परिसरात सेन्सर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या आडोशी बोगद्याजवळ कोसळलेल्या दरडीप्रमाणेच दोन किलोमीटरच्या परिसरात सात ठिकाणी अशाचप्रकारे दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे खंडाळा घाटाच्या परिसरातही शनिवारी कोसळलेलया दरडीच्या परिसरातही धोकादायक दरडी आहेत. मुळातच हा परिसर ठिसूळ झाल्याने सुरूंग स्फोटाने दरड काढल्यास दरडी अधिक धोकादायक ठरतील असा निष्कर्ष सज्ज्ञांनी काढलयामुळे आता कोणत्याही प्रकारचे स्फोट न करता हे दगड काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या सेन्सरमुळे जाळीवरील ताण वाढताच त्याची कल्पना एसएमएसच्या माध्यमातून एमएसआरडीसीला मिळेल. त्यामुळे लागलीच त्या ठिकाणची वाहतूक रोखून संभाव्य धोका टाळता येईल असा विश्वास एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून स्टीलच्या साह्य़ाने हा बोगद्याचा विस्तार केला जाणार आहे. मात्र ही कामे करीत असतांना वाहतूकीचा खोळंबा टाळावा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तरी अजून एक ते दोन आठवडे हे काम सुरू राहणार असल्याने वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागणार.
सुरक्षा उपाययोजना
आडोशी बोगद्याच्या बाजूला वारंवार दरडी कोसळत असल्यामुळे या बोगद्याचा पुण्याच्या दिशेला १०० मिटर विस्तार करण्यात येणार असून त्याला लागूनच संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे. करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अशाचप्रकारे खंडाळा घाटातील बोगद्याचाही ३०० मिटर विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून स्टीलच्या साह्य़ाने हा बोगद्याचा विस्तार केला जाणार आहे.