25 November 2020

News Flash

“ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस, लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार”

मुंबई उपगनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य

ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे असं वक्तव्य मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने सोमवारीच दोन लाखांचा टप्पा ओलांडला. ही बातमी ताजी असतानाच आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर खासगी कार्यालयं २४ तास सुरु रहावीत असा आमचा विचार आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये येण्याची मुभा राहिल. लोकलही पूर्ण क्षमतेने ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरु करण्याचा विचार आहे. जर खासगी ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले तर लोकल्समध्ये होणारी गर्दी कमी होऊ शकते असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खासगी कार्यालये हळू हळू सुरु करतो आहोत. ही कार्यालयं २४ तास सुरु ठेवण्याबाबत सरकारची संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. एवढंच नाही लवकरच आमचा रेस्तराँ सुरु करण्याचाही विचार आहे. करोनामुळे लॉकडाउन करावा लागला होता. मात्र हळूहळू आम्ही सगळ्या गोष्टी सुरु करतो आहोत असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र एक बाब निश्चित की हे सगळं लोकांनी शिस्त पाळण्यावर अवलंबून असणार आहे.

आणखी वाचा- Good News: लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते लोकल प्रवासाची परवानगी

करोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करुन देणं, वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणं ही जशी सरकारची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आपण घराबाहेर पडताना आपली काळजी घेणे आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ न देणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. कारण आपण आपली काळजी घेतली नाही तर आपण फक्त आपला धोका वाढवत नाही तर कुटुंबाचाही धोका वाढवतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. बाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करणं आवश्यक आहे. एवढंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगही पाळलं गेलंच पाहिजे असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 1:58 pm

Web Title: maharashtra government mulling 24 by 7 offices local trains for all by mid october says aaditya thackeray scj 81
Next Stories
1 सुशांत प्रकरणात एम्सचा रिपोर्ट आल्याने भाजपाचं तोंड काळं झालं-काँग्रेस
2 Good News: लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते लोकल प्रवासाची परवानगी
3 मराठा आरक्षणासाठी नक्की कोणाला ठोकायचं?; शिवसेनेने मागितलं उत्तर
Just Now!
X