14 October 2019

News Flash

राज्यातील २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची बदली झाली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करत राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख म्हणून केली असून एटीएसच्या प्रमुखपदी देवेन भारती यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर मुंबई पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची बदली झाली आहे.

राज्य सरकारने पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या नऊ, पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या १० आणि अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या नऊ अशा २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी केल्या.

सध्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजीव सिंघल यांची बदली मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) म्हणून करण्यात आली आहे. त्यांची जागा आता अतुलचंद्र कुलकर्णी घेतील.

या प्रमुख नियुक्त्यांसह विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, दीपक पांडे, प्रताप दिघावकर, पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आदींची बदली करण्यात आली आहे.

First Published on May 16, 2019 3:08 am

Web Title: maharashtra government orders transfer of 28 ips officers