News Flash

शहरी भागातील मलमूत्राचा वापर सेंद्रिय शेतीसाठी करण्याची खडसेंची योजना

शहरी जनतेला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या मदत करता यावी, यासाठी राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी एक अनोखी योजना आखली आहे.

| May 9, 2015 11:57 am

शहरी जनतेला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या मदत करता यावी, यासाठी राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी एक अनोखी योजना आखली आहे. त्यानुसार आगामी काळात शहरी भागातील मल्टिप्लेक्सेस आणि मॉलमधील मानवी मलमूत्राचा वापर सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
मुंबईतील मल्टिप्लेक्समधून मोठ्या प्रमाणावर मानवी मूत्र जमा करता येईल असा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांचा अंदाज आहे. मध्यंतरामध्ये मोठ्या प्रमाणावर मूत्र विसर्जित केले जाते. हे एकत्रित करुन शेतीसाठी ग्रामीण भागात पाठवता येईल असे ते म्हणाले. गेल्या काही काळात रासायनिक खतांच्या वापरामुळे राज्यातील शेतजमीन मोठ्याप्रमाणावर नापीक झाली आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करणे अपरिहार्य आहे. म्हणूनच सेंद्रिय खतांच्या निर्मितीसाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढले पाहिजेत, असे खडसे यांनी म्हटले. राहुरी विद्यापीठात मानवी मलमुत्राच्या सहाय्याने सेंद्रिय खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्याचेही खडसे यांनी  सांगितले. याशिवाय, राज्यातील अशाप्रकारच्या प्रकल्पांना ३५ टक्के सबसिडी देण्याचीही सरकारची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील मानवी मूत्र शेतीसाठी उपयुक्त असून आपणही ते वापरल्याचे सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2015 11:57 am

Web Title: maharashtra government plan to use human waste for organic farming
Next Stories
1 मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी
2 विलेपार्ल्याच्या पद्मावती इमारतीला भीषण आग
3 काळबादेवीत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचा अधिकारी गंभीररित्या भाजला
Just Now!
X