15 August 2020

News Flash

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात कायदा?

सार्वजनिक ठिकाणी कोणाचीही पर्वा न करता तंबाखू थुंकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अगदी शासकीय रुग्णालयांतही जवळपास सर्व भिंती पान-तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांनी रंगविलेल्या दिसतात.

राज्य सरकारच्या हालचाली, छाननी समिती कार्यरत

सार्वजनिक ठिकाणी कोणाचीही पर्वा न करता तंबाखू थुंकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी शासकीय रुग्णालयांतही जवळपास सर्व भिंती पान-तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांनी रंगविलेल्या दिसतात. याविरोधात कठोर कारवाई करणारा कायदा सरकार तयार करीत असून त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासण्यासाठी छाननी समितीची बैठक गुरुवारी मंत्रालयात पार पडली.
कायद्यात कोणत्याही पळवाटा राहू नयेत, यासाठी छाननी समितीच्या माध्यमातून सर्व बाबींची तपासणी होत आहे. गुरुवारच्या बैठकीला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
थुंकण्यास प्रतिबंध करणारा पहिला आदेश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी शासकीय रुग्णालयांसाठी गेल्या वर्षी जारी केला होता. तसेच आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी याबाबत कठोर कायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला.
तसेच सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कत थुंकण्याविरोधात प्रबोधन कसे करावे यावरही बैठकीत चर्चा झाली.

’थुंकण्याला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र आरोग्य रक्षण आणि थुंकी प्रतिबंधक अधिनियम २०१५’ तयार करण्यात येत आहे.
’या अंतर्गत दंडाची व्याप्ती, आकारणीचे अधिकार कोणाला द्यायचे, यावर मंत्रालयात बैठकीत चर्चा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2015 3:35 am

Web Title: maharashtra government plans to make law against spitting in public places
Next Stories
1 विधान परिषदेसाठीही दोन्ही काँग्रेस एकत्र
2 कुर्ला पश्चिमेस १९-२० ऑक्टोबरला पाणी नाही
3 हसन मुश्रीफ यांना नोटीस
Just Now!
X