१ लाख ७३ हजार व्यक्तींचे विलगीकरण, ४० लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण

मधु कांबळे, लोकसत्ता

मुंबई:  महाराष्ट्रातील करोना बाधितांची संख्या वाढत असली, तर या साथरोगावर मात करण्यासाठी राज्य सरकारनेही निर्णायक लढाई सुरु के ली आहे. जोखमीच्या भागातून स्थलांतरीत झालेले व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपासून कोणताही धोका निर्माण होऊन नये म्हणून अशा १ लाख ७३  हजार ६७०  व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात घरगुती विलगीकरण करण्यात आलेल्या १ लाख ६२ हजार ८६०  व्यक्तींचा व संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या १०८१० व्यक्तींचा समावेश आहे.

राज्यात सध्या ६६४ अतिसंक्रमीत व  नियंत्रित क्षेत्रे तयार करण्यात आली असून, त्यांतील ४० लाखाहून अधिक  व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आरोग्य विभागातून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची बुधवापर्यंतची संख्या ९ हजार ९१५ होती. राज्यात अधिक-अधिक चाचण्या घेऊन बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. १ लाख ३७ हजार ९३१ व्यकींच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी १लाख २६ हजार ३७६ जणांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले. उपचारानंतर १५९३ रुग्ण बरे होऊन त्यटांना आपापल्या घरी पाठविण्यात आले आहे.

राज्यात करोनाविरुद्धच्या लढाईत जास्तीत जास्त चाचण्या करणे, बाधित रुग्णांची संख्या जास्त असेल, तेथे अतिसंक्रीमतव  नियंत्रित क्षेत्रे तयार करणे, स्थलांतरीत, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवून, या साथरोगावर मात करण्याचा प्रयत्न के ला जात आहे.

या संदर्भात आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, ज्यांना करोनाची लक्षणे आहेत, त्यांना थेट रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार के ले जातात. परंतु ज्यांना बाधा झालेली नाही, परंतु ज्या व्यक्ती जिथे जास्त रुग्णांची संख्या आहे, अशा बाधित क्षेत्रातून स्थालंतरीत झाले आहेत, जे रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, अशा लोकांना विलगीकरणात ठेवले जाते. त्यासाठी जे बाधित रुग्ण आहेत, त्यांच्या संपर्क त आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातोत.

त्यातही दोन वर्गवारी के ली आहे. अति झोखमीचे व कमी जोखमीचे लोक अशी  वर्गवारी आहे. जे लोक थेट बाधित रुग्णांच्या संपर्कत आलेले म्हणजे बहुतांश त्याच्या कु टुंबातील व्यक्ती असतात, त्यांना अति झोखमीच्या व्यक्ती समजून त्यांना वसतीगृहे किं वा तत्सम ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाते. जे लोक बाधित रुग्णाच्या फार कमी वेळासाठी म्हणजे अगदी दहा-पंधरा मिनिंटांच्या कालावधीसाठी संपर्कात आलेले आहेत, त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात येते.

विलगीकरणाचा कालावधी १४ दिवसंचा असतो, त्या कालावधीत ज्यांना करोनाची लक्षणे आढळतील त्यांना रुग्णालयात दाखल के ले जाते, ज्यांना काही लक्षणे दिसत नाहीत, त्यांना विगकीकरणातून मुक्त के ले जाते.

ज्यांना करोनाची लक्षणे नाहीत, परंतु ज्यांच्या पासून आपल्याला जोखीम वाटते, त्यांना समाजापासून ठराविक कालावधी पर्यंत दूर ठेवून करोना साथरोगावर मात्र करण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.