News Flash

चिनी कंपन्यांचं काय करायचं? ठाकरे सरकारला मोदी सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

चिनी कंपन्यांसोबतचे करार पुन्हा अंमलात येईल अशी ठाकरे सरकारला खात्री

संग्रहित छायाचित्र

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असताना महाराष्ट्र सरकार चिनी कंपन्यासंबोत करण्यात आलेल्या करारांसंबंधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत अशी माहिती दिली होती. दरम्यान मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी करार अंमलात येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे की, “चिनी कंपन्यांसोबत झालेले करार आम्ही रद्द केलेले नाहीत. सध्याच्या परिस्थितीत आम्ही फक्त थोडे थांबलेलो आहोत. भारत सरकारच्या सूचनेची वाट पाहत आहोत. परंतू आजच सकाळी आम्हाला चांगली बातमी मिळाली की, चीनसोबतचं वादंग जवळजवळ मिटत आलेलं आहे. संबंध पूर्ववत होतील, त्यामुळे याच्यात काही अडथळा येईल असं वाटत नाही”.

“यामध्ये मोटर उद्योग आहेत. भारताने ज्या विशिष्ट उद्योगांसंबंधी टिप्पणी केली होती त्यात हे मोडत नाहीत. मोटारींचा उद्योग नियमितपणे होऊ शकेल असं चित्र सध्या तरी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आमचे करार अंमलात येतील याची आम्हाला खात्री वाटत आहे,” असं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, एक हजार कोटी आणि 3 हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात बोलताना सुभाष देसाई यांनी याआधी सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल असं सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 5:24 pm

Web Title: maharashtra government subhash desai on mou signed with chinese companies sgy 87
Next Stories
1 मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘टी-सीरिज’ने मागितली जाहीर माफी
2 एशियाटिक सोसायटीतील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
3 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मालिकांचे चित्रीकरण नाही
Just Now!
X