26 February 2021

News Flash

मुंबई-ठाणेकरांना टोल दिलासा

मुलुंड आणि एरोली या दोन्ही नाक्यांवरील टोलमधून दिलासा मिळणार आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ऐरोली किंवा मुलुंड नाक्यावर एकदाच टोल

मुंब्रा बायपास रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी या मार्गावरील वाहतूक आनंदनगर चेकनाका- ऐरोलीमार्गे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना टोलभारमधून दिलासा देण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या असून मुलुंड किंवा ऐरोली यापैकी कोणत्याही एका नाक्यावर टोल भरल्यास दुसऱ्या नाक्यावर टोल भरावा लागणार नाही. त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

मुंब्रा बायपास मार्गावर अवजड वाहनांची सतत गर्दी असल्यामुळे मध्य रेल्वेवरील उड्डाणुलास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात असून दुरुस्तीचे काम येत्या १६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे बायपास मार्ग पुढील दोन-तीन महिने बंद राहणार असून या दरम्यानच्या काळात ही वाहतूक ठाण्यातील आनंदनगर- ऐरोलीमार्गे वळविण्यात येणार आहे. परिणामी  मुंबई-ठाणेकरांना आनंदनगर टोलनाक्यावरील मोठय़ा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई आदी महापालिकांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

या मार्गावर लोकांना मुलुंड आणि एरोली या दोन्ही नाक्यांवरील टोलमधून दिलासा मिळणार आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, ऐरोली आणि मुलुंड  या दोन टोलनाक्यांमधील अंतर कमी असून लोकांना नाहक भुर्दंड पडू यासाठी एका टोलनाक्यावरच  टोल भरल्यास दुसऱ्या टोलनाक्यावर सवलत देण्याच्या प्रस्तावावर सरकार लवकर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 3:35 am

Web Title: maharashtra government to give toll relief for mumbai and thane residents
Next Stories
1 गोव्यात कचऱ्याचा डोंगर भुईसपाट!
2 रजा काढून गावी, पण.. पाण्याच्या ‘पेरणी’साठी!
3 जातिव्यवस्था निर्मूलनासाठी तरुण पिढीने पुढे यावे!
Just Now!
X