27 February 2021

News Flash

दिवाळीत सातवा वेतन आयोग?

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घोषणेचा राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. त्या

( संग्रहीत छायाचित्र )

वेतन, व्याजावर ५७ टक्के खर्च, आता वाढीव पगाराचाही बोजा; १० हजार कोटींची तरतूद

वेतन, निवृत्तिवेतन आणि व्याज फेडण्यावर एकूण जमा होणाऱ्या महसुलापैकी ५७.५० टक्के रक्कम खर्च होणार असतानाच, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधार मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली. अर्थसंकल्पात वाढीव वेतनाकरिता १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुमारास सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घोषणेचा राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. त्यात शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी, पोलीस, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या वर्षांत वेतन व निवृत्तिवेतनावरील खर्च सुमारे एक लाख ३० हजार कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षांपेक्षा ही वाढ २२ हजार कोटी रुपयांची आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्य कर्मचाऱ्यांना आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी अधिकारी व कर्मचारी संघटनांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी तत्त्वत मान्य करून सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर नेमका किती बोजा पडणार आहे, याचा अभ्यास करण्यासाठी माजी सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधारणा अभ्यास समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल  तीन महिन्यांत सादर होण्याची शक्यता आहे.

समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू केला जाईल, असे मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 2:51 am

Web Title: maharashtra government to implement 7th pay commission in diwali
Next Stories
1 इच्छामरणाचा हक्क आवश्यक!
2 बालभारतीच्या पाठय़पुस्तकांचे स्वामित्व राज्य सरकार घेणार!
3 राज्यसभेसाठी राणे राजी, खडसे यांनाही भाजपची गळ
Just Now!
X