सत्ता हातातून गेल्याने विरोधक अस्वस्थ, शरद पवार यांचा टोला
मुंबई : मागील ५० वर्षांमध्ये सरकारला एक वर्ष पूर्ण होताच कामगिरीची इतकी चिकित्सा सुरू झाल्याचे मी कधी पाहिले नाही. पण महाविकास आघाडी सरकारबाबत सध्या ते सुरू आहे. कधी नव्हे ती मिळालेली सत्ता हातातून गेल्यामुळे आलेली अस्वस्थता त्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. तसेच महाविकास आघाडी सरकार पाचच ५ काय २५ वर्षे राज्याचा गाडा हाकू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त के ला.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या पुस्तिके चे प्रकाशन के ल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक प्रतिनिधीने आपल्यावरील जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे संकटग्रस्तांनाही हे सरकार आपल्यासोबत असल्याचा विश्वास वाटतो. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर करोनाचे संकट, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीवर संकट अशा अनेक संकटांमधून मार्ग काढत हा जगन्नाथाचा रथ राज्य सरकारमधील नेते यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेत, असे कौतुक पवार यांनी के ले. महाराष्ट्र हे उद्योगधंदे असलेले महत्त्वाचे राज्य आहे. राज्याची गती थांबली तर देशाचे अर्थचक्र थांबू शकते. त्यामुळे कारखान्यांचे चक्र कसे सुरू राहील, लोकांच्या हातातले काम जाणार नाही, याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष दिले. त्यामुळे राज्यातील कारखानदारी आणि उद्योगधंदे बंद पडले नाहीत, याबद्दलही पवार यांनी सरकारला शाबासकी दिली.
उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्वीचा अनुभव नसला तरी चतुरपणे त्यांनी सहकाऱ्यांसह यशस्वीपणे सरकार चालवले आहे. राज्यातील जाणत्या व ज्ञानी लोकांनाही सरकार चांगले काम करत असल्याचे वाटते, असेही पवार यांनी नमूद के ले.
उद्धव ठाकरे अबोल पण चतुर
मुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर आहेत, अशा मिश्किल शब्दांत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय चातुर्याचे कौतुक के ले. ठाकरे यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्ष जनतेसाठी काम करत राहीलच. पण के वळ पाच वर्षे चालेल हा कद्रूपणा कशाला. जनतेच्या आशीर्वादाने २५ वर्षे राज्याचा गाडा हाकता येईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त के ला.
मोदी सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष के ल्याने उद्रेक
गेल्या ८-१० दिवसांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उपोषणासाठी बसला आहे. राज्यकर्त्यांंनी शेतकऱ्यांच्या चिंतेकडे-प्रश्नाकडे हवे तसे लक्ष न दिल्याने आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्या संतापाचा उद्रेक या आंदोलनातून दिसत आहे, अशा शब्दांत के ंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर शरद पवार यांनी टीका केली.
‘सरकारवर कोणी संकट आणले तरी मात करू’
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या वर्षांत करोनासह चक्रीवादळ, अतिवृष्टी अशी विविध संकटे आली. पण महाराष्ट्र कधी घाबरला नाही व घाबरणारही नाही. त्या सर्व संकं टांवर सरकारने मात के ली असून कोणी महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट आणू इच्छित असेल तर ते मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले. तसेच शिवसेना आधीही कोणामागे फरफटत गेली नाही व आताही जाणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 4, 2020 3:12 am