News Flash

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर राज्यपाल कोश्यारी नाराज, केंद्राला पाठवणार रिपोर्ट

मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांकडून घेतली माहिती

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे. महापालिकेनं केलेल्या या कारवाईवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्याकडून राज्यपालांनी माहिती घेतली असून, यासंदर्भात केंद्राला रिपोर्ट पाठवणार असल्याचं वृत्त आहे.

‘आजतक’नं याविषयीचं वृत्त दिलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांविषयी केलेल्या विधानांवरून कंगना आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली होती. हा वाद शिगेला गेलेला असतानाच महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यावरून बरेच घमासान सुरू आहे.

या प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही लक्ष घातलं आहे. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्याशी याबद्दल चर्चा केली. या कारवाईबाबत राज्यपाल केंद्राला रिपोर्ट देणार असल्याचंही वृत्त आहे.

मुंबई बृह्नमहापालिकेनं बुधवारी (९ सप्टेंबर) कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत काम पाडलं. यावरून कंगनानं संतापही व्यक्त केला होता. महापालिकेच्या कारवाईविरोधात कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानं कारवाईला स्थगिती दिल्यानंतर महापालिकेनं कारवाई थांबवली होती. मात्र, यावरून चर्चा पेटली.

कंगना ट्विटमध्ये मुंबई पोलिसांबद्दल काय म्हणाली होती?

राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनानं हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 1:10 pm

Web Title: maharashtra governor appointed on bmc bmh 90
Next Stories
1 “कंगनाचं ऑफिस तोडू शकता, पण…”; गीता फोगाटचं ठाकरे सरकारला ‘चॅलेंज’
2 बेकायदेशीर बांधकाम : मनिष मल्होत्राला बीएमसीची नोटीस, सात दिवसांत द्यावं लागणार उत्तर
3 तुरुंगात असलेल्या रियाला जेवणात मिळतायेत ‘हे’ पदार्थ!
Just Now!
X