News Flash

राज्यपालांनी राज ठाकरेंना दिला शरद पवारांना भेटण्याचा सल्ला, म्हणाले…

"तुम्ही शरद पवारांना भेटा"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले होते. यावेळी राज ठाकरेंनी राज्यपालांसमोर वाढीव वीज बिलाचा मुद्दा मांडत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. राज्यपालांनी यावेळी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे यांनी राज्यपाल भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आपण लवकरच शरद पवारांना भेटणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“लोकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. याप्रकरणी अदानी, बीएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल आम्ही कमी करु शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. पक्षाचं एक शिष्टमंडळ जाऊन एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. त्यांच्याकडन लेखी स्वरुपात पत्र आलं. कंपन्या वीज बिलं कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आमचं त्यांच्यावर दडपण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एका बाजूला कंपन्या एमईआरसीकडे बोट दाखवत आहेत, दुसरीकडे एमईआरसी आमचं काही दडपण नाही म्हणतायत,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

“नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितलं, पण अजून तो होत नाही. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी एकदा शरद पवारांशी बोलून घ्या सांगितलं. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटतं हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. लोकांना जिथे २००० बिल येत होतं तिथे १० हजार बिल येत आहे. राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण कशात अडकलं आहे कळत नाही,” अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

“याचा निर्णय तात्काळ घ्यायला पाहजे. त्याच्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. शरद पवारांशी फोनवरुन किंवा प्रत्यक्षात जाऊन चर्चा करणार. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार. हा विषय त्यांना माहिती नाही असं नाही. अर्थात त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली की त्यावर काम सुरु आहे सांगतात पण त्यावर निर्णय होत नाही,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

“अनेकांचे रोजगार गेलेत, पैसे नाहीत त्यात बिल कसे भरणार? एका छोट्या निर्णयासाठी एवढे दिवस लागणार याला काय अर्थ आहे. एक दोन दिवसात निर्णय घ्यावा अशी विनंती आहे. राज्यपालही बोलणार आहेत. सरकार आणि राज्यपालांचं फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही. पण ते सरकारसमोर गोष्ट मांडतील,” अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 11:38 am

Web Title: maharashtra governor bhagat singh koshyari advice mns chief raj thackeray to meet ncp sharad pawar sgy 87
Next Stories
1 राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, मांडला वाढीव वीज बिलाचा मुद्दा
2 “इच्छाशक्तीच्या जोरावर वाहतूक कोंडी फोडून दाखवू”; मनसे आमदार राजू पाटील उतरले रस्त्यावर
3 तारापूर औद्योगिक वसाहतीलगतच्या जमिनीत रसायनयुक्त पाणी
Just Now!
X