07 July 2020

News Flash

मुंबईकरांना दिलासा! आजपासून या गोष्टी होणार सुरू

महाराष्ट्रात अनलॉक १.० ला सुरुवात

(संग्रहित छायाचित्र)

राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार आजपासून महाराष्ट्रात अनलॉक १.० ला सुरुवात होत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत आजपासून काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकानं सुरु होणार असली तरी तिथे आता आपल्याला पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. काही गोष्टींचे आपल्याला पालन करावे लागले.

– मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी प्रवास करता येईल.

– पहाटे पाच ते रात्री सात या वेळेत नागरिकांसाठी उद्याने, मैदाने खुली करण्यात आली आहेत. यावेळेत नागरिक व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.

– दुकान सम-विषम नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील. नियमांचं पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसंच दुकानं मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं असेल.

– कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.

– रविवारपासून म्हणजेच ७ जून २०२० पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

– शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 7:55 am

Web Title: maharashtra govt mission begin again unlockdown 1 0 from today shops gardens open dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 पोलिसांसमोर नवे आव्हान
2 खासगी रुग्णालयांवर पालिके चा वचक
3 अत्यावश्यक सेवेतील २२ हजार सुरक्षारक्षक बेदखल
Just Now!
X