राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ मार्चपासून सुरु होत असून राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार आहे. हे अधिवेशन ९ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत चालणार असून राज्यपालांचे अभिभाषण प्रथेनुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी  होईल.

विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, धनंजय मुंडे आदी त्यास उपस्थित होते. आधीच्या प्रस्तावानुसार अर्थसंकल्प १७ मार्चला सादर होणार होता. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला अधिक वेळ मिळावा, यासाठी तो एक दिवस पुढे ढकण्यात आल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.