News Flash

महाराष्ट्र देशासाठी कायमच दिशादर्शक-शरद पवार

सरहदने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांचं वक्तव्य

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र हा कायमच देशासाठी दिशादर्शक ठरला आहे असं वक्तव्य  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सरहद या संस्थेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्वाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तिन्ही राज्यांनी देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे.  असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात चित्रपट निर्माते निलेश नवलाखा, डॉ. अमोल देवळेकर, संयोजक युवराज शहा, विकास सोनताटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये जे भारतमातेचे अनेक सुपुत्र होते त्यात लाल-बाल आणि पाल यांची महत्त्वाची भूमिका होती. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारतीयांना एकसंध ठेवण्याची कामगिरी भारतीय राष्ट्रीय सभेने केली. याचं नाव नंतर राष्ट्रीय काँग्रेस म्हणून केला गेला. ११८५ मध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुण्यात होणार होतं. आज सगळ्या जगात करोनाचं जसं संकट आहे तसं ते अधिवेशन ठरलेलं असताना प्लेगचं संकट पुण्यात आलं. त्यामुळे ते अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईला घेण्याचा निर्णय घेतला गेला. ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणी हे अधिवेशन झालं अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 2:56 pm

Web Title: maharashtra is always a guide for the country says sharad pawar in mumbai scj 81
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी गँगच्या सदस्याची तळोजा कारागृहात आत्महत्या
2 आनंद महिंद्रांनी मुंबईकर दाम्पत्याला दिले चार लाख रुपये, जाणून घ्या कारण
3 Coronavirus :…तरच बिल्डिंग करणार सील; BMCनं नियमात केला बदल
Just Now!
X