News Flash

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वय समिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. याशिवाय याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी चर्चा करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे.

मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर तातडीने सीमाप्रश्नी मंत्रालयात बैठक बोलावून एकीकरण समितीला निमंत्रण दिले, यावरून या प्रश्नावर महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली इच्छा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वानी एकत्र यावे, असे आवाहनही ठाकरे यांनी या बैठकीत  केले. सीमा भागातील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढय़ात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रीतीने जाण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली इच्छा असून कायदेशीर लढय़ात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रीतीने पुढे जाण्याची गरज आहे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:27 am

Web Title: maharashtra karnataka border question coordination committee abn 97
Next Stories
1 आयआयटी टेकफेस्टमध्ये यंदा ‘पब्जी’चा समावेश
2 मुंबईत आता संध्याकाळीही साफसफाई
3 मुंबईत दारूच्या नशेत कारने तरूणीला उडवले, कुटुंबीयांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
Just Now!
X