मुंबई: करोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले  जात असले, तरी लशींच्या टंचाईमुळे ही मोहीम अडचणीत सापडली आहे. देशभरात लशीची टंचाई असतानाही राज्याने केवळ लशीच्या सर्वाधिक मात्रा  देण्यातच नाही, तर  २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यातही अव्वल स्थान पटकावले आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत एक कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या सगळीकडेच लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागत आहेत. मात्र कें द्राकडून पुरेसा साठा मिळत नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना लसीकरण न करताच परतावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांमध्ये अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. मात्र केंद्राकडून लसच उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी लसीकरण थांबवावे लागत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसच येत नसल्याने आता राज्याने खरेदी के लेली लस ४५ वर्षांपुढील नागरिकांना देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

बुधवारी  १५८६ लसीकरण केंद्रांद्वारे दोन लाख ५९ हजार ६८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील एक लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे.

राज्याने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर राज्यात लस वाया जाण्याचे  प्रमाण एक टक्का आहे.

राज्यात आतापर्यंत एक कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली

२८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक नागरिकांना दोन्ही मात्रा देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.