04 July 2020

News Flash

अशोक चव्हाण रुग्णालयात

चव्हाण हे गेल्याच आठवडय़ात मुंबईहून नांदेडला गेले होते.

संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद / मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना रविवारी नांदेडमध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.  मुंबईतील त्यांच्या कार्यालयाने त्याला दुजोरा दिला. चव्हाण हे गेल्याच आठवडय़ात मुंबईहून नांदेडला गेले होते. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली असता अहवालात संसर्ग झाल्याचे निषन्न झाले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 6:00 am

Web Title: maharashtra minister ashok chavan tests covid 19 positive zws 70
Next Stories
1 नियुक्त्यांचा अधिकार सरकारचाच
2 मागणीनुसार गाडय़ा देण्याची रेल्वेमंत्र्यांची तयारी
3 Coronavirus : मुंबईत तीस हजारांवर रुग्ण
Just Now!
X