News Flash

वीजचोरीविरोधातील ‘महाराष्ट्र मॉडेल’चे मोदींकडून कौतुक

सध्या देशात सर्वत्र ‘गुजरात मॉडेल’चा गवागवा असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र देशातील ऊर्जा क्षेत्राच्या आढावा बैठकीत वीजचोरीनियंत्रणासाठी महाराष्ट्राने राबवलेल्या मॉडेलचे कौतुक केले.

| July 7, 2014 03:52 am

सध्या देशात सर्वत्र ‘गुजरात मॉडेल’चा गवागवा असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र देशातील ऊर्जा क्षेत्राच्या आढावा बैठकीत वीजचोरीनियंत्रणासाठी महाराष्ट्राने राबवलेल्या मॉडेलचे कौतुक केले.
केंद्रीय ऊर्जाराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पियुष गोयल यांनी नुकतीच देशातील वीजपरिस्थितीची माहिती देणारे सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. त्यावेळी वीजहानीबाबत चर्चा सुरू असताना वीजचोरी रोखण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीचा आणि कठोर उपाययोजनांचा उल्लेख करत मोदी यांनी वीजचोरीविरोधातील या ‘महाराष्ट्र मॉडेल’चे कौतुक केले.
महाराष्ट्रात जादा वीजचोरी असलेल्या भागांत सक्तीचे भारनियमन कठोर धोरण म्हणून ठेवण्यात आले आहे. तसेच भरारी पथकांच्या सा’ााने वीजचोरांविरोधात कारवाई सुरू असते. महाराष्ट्राच्या या पद्धतीची दखल इतर राज्यांनीही आता घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 3:52 am

Web Title: maharashtra model against power theft
Next Stories
1 दाऊदची बहीण हसीना हिचा मृत्यू
2 पहिल्या फेरीनंतर ‘आयआयटी’च्या ६५० जागा रिक्त
3 मुरुडमधील दुर्घटनेमुळे घाटल्यावर दु:खाचा डोंगर
Just Now!
X