28 September 2020

News Flash

प्लास्टिक कारवाईवरील दंडाची रक्कम कायम

दंड कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मागे

दंड कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मागे

प्रतिबंधित प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदार, फेरीवाल्यांकडून यापुढेही पाच ते दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दंडाची रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे.

दंडाची रक्कम कमी करण्याचे अधिकार पालिकेला नसून ते राज्य सरकारलाच असल्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना दंडाच्या रकमेतून सूट मिळू शकणार नाही.  गेल्या वर्षी गुढीपाडव्यापासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू झाली. त्यानंतर प्रत्यक्षात २३ जूनपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. बंदी असलेले प्लास्टिक बाळगणारे फेरीवाले, दुकानदार यांना पहिल्या गुन्ह्य़ासाठी पाच हजार रुपये तर दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास १० हजार रुपये दंड आकारला जात होता. मात्र दंडाची रक्कम खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्य  विक्रेत्यांना  परवडेल अशी दंडाची रक्कम असणारा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 1:32 am

Web Title: maharashtra plastic ban 20
Next Stories
1 बुलेट ट्रेनचे भूसंपादन अधांतरीच
2 ‘शादी डॉट कॉम’वरील तरुणींच्या ‘प्रोफाइल’चा गैरवापर
3 रेल्वेच्या ३५ पुलांची पाहणी पूर्ण
Just Now!
X