News Flash

दरवर्षी १५ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ‘महावितरण’ने आगामी तीन वर्षांच्या वीजखरेदी-विक्रीचा ताळेबंद प्रस्ताव सादर केला असून त्यानुसार २०१३-१४ मध्ये वीजग्राहकांची मागणी भागवून राज्याकडे सुमारे ६०० दशलक्ष

| April 12, 2013 05:47 am

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ‘महावितरण’ने आगामी तीन वर्षांच्या वीजखरेदी-विक्रीचा ताळेबंद प्रस्ताव सादर केला असून त्यानुसार २०१३-१४ मध्ये वीजग्राहकांची मागणी भागवून राज्याकडे सुमारे ६०० दशलक्ष युनिट वीज इतरांना विकण्यासाठी उपलब्ध असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर या वर्षी तब्बल ८८७१ कोटी रुपयांची दरवाढ करावी लागेल असाही अंदाज या प्रस्तावात वर्तवण्यात आला असून त्यासाठी वीजदर सरासरी १५ टक्क्यांनी वाढवण्याची गरज पडेल.
वीजहानी वजा जाता राज्याला २०१३-१४ या आर्थिक वर्षांत एकूण ९२,४५१ दशलक्ष युनिट वीज उपलब्ध होईल. त्यापैकी ९१,८५१ दशलक्ष युनिट वीज राज्यातील वीजग्राहकांची मागणी भागवण्यासाठी लागेल. परिणामी, राज्यातील ग्राहकांची गरज भागवल्यानंतर ६०० दशलक्ष युनिट वीज शिल्लक राहील आणि ती बाजारपेठेत विकता येईल, असे ‘महावितरण’ने या प्रस्तावात नमूद केले आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील विजेची तूट संपेल व राज्यात अतिरिक्त वीज उपलब्ध असेल, असा निष्कर्ष त्यातून निघत आहे. पुढच्या वर्षी २०१४-१५ या वर्षी राज्यात १७,४०० दशलक्ष युनिट तर २०१५-१६ मध्ये २३,९०० दशलक्ष युनिट वीज अतिरिक्त असेल असा अंदाज ‘महावितरण’ने या प्रस्तावात वर्तवला आहे.
‘महावितरण’ला २०१२-१३ मध्ये वीजदरातून वर्षांला ४८ हजार ९२६ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. २०१३-१४ मध्ये ५७,७९७ कोटी रुपयांच्या महसुलाची आवश्यकता पडेल असे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी सरासरी वीजदर १५ टक्क्यांनी वाढवावा लागेल असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 5:47 am

Web Title: maharashtra power regulator indicated to hike 15 electricity tariffs every year
Next Stories
1 भ्रष्ट सरकारची हद्दपारी, अजितदादांचा राजीनामा हा संकल्प
2 नदी-नाल्यांतील गाळ मुंबईकरांचा कर्दनकाळ बनण्याची शक्यता
3 कॅल्शियम काबरेनेटवर बंदी घातल्याने आंबा व्यापारी हतबल
Just Now!
X