राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांशी संबंधित राज्यभरात ९ ठिकाणी सोमवारी अंमलबजावणी संचलनालयाने(ईडी) छापे टाकले आहेत. यात भुजबळ कुटुंबियांची काही घरे आणि कार्यालयांचा समावेश आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भुजबळ यांनी सुमारे ६२ बँक खात्यांतून संशयास्पद व्यवहार केल्याने हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आता भुजबळ यांची अटक आता अटळ आहे, असेही सोमय्या यावेळी म्हणाले.
बांधकाम खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडेंवर निलंबनाची कारवाई
यापूर्वी मागील वर्षी जून महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकूण १६ ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयानेही आपली कारवाई अधिक वेगवान करत भुजबळांच्या मुंबईतील काही ठिकाणांवर छापे टाकले होते.
छगन भुजबळ यांच्यावर आणखी दोन गुन्हे