28 May 2020

News Flash

महाराष्ट्र सदन प्रकरणातील मुख्य अभियंता पुन्हा सेवेत!

उलटपक्षी महाराष्ट्र सदन प्रकरणातील फर्निचरच्या कामासाठी पैसे दिल्याचे दिसून येते.

Maharashtra Sadan : हे कर्मचारी माझ्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले, अशी तक्रार अनिल गायकवाड यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर कँटिनमधील दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून निलंबन मागे

वर्षभरापासून तुरुंगात असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना ज्या महाराष्ट्र सदन आणि कालिना येथील राज्य ग्रंथालय भूखंडप्रकरणी अटक करण्यात आली, त्यापैकी पहिल्या प्रकरणातील सातव्या क्रमांकाचे आरोपी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंते अनिलकुमार गायकवाड यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. विकासकाला फायदा करून देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला असा आरोप असतानाच या अभियंत्याला सेवेत घेऊन एक प्रकारे कंत्राटात घोटाळा नसल्यावरच शासनाने शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आता ऐकायला मिळत आहे.

सांताक्रूझ येथील राज्य ग्रंथालयाचा भूखंड इंडिया बुल्सला आंदण देताना भुजबळ यांच्या ट्रस्टला अडीच कोटींची लाच दिल्याचे प्रकरण सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने उघड केले. त्यामुळे   या प्रकरणात भुजबळांचा थेट संबंध दिसून येत होता. मात्र महाराष्ट्र सदन प्रकरणात कंत्राटदार मे. चमणकर आणि इंटरप्रायझेस यांनी १३ कोटींची लाच दिल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) आरोप असला तरी थेट पुरावा आढळत नव्हता. उलटपक्षी महाराष्ट्र सदन प्रकरणातील फर्निचरच्या कामासाठी पैसे दिल्याचे दिसून येते. राजेश मेस्त्री वा इतरांनी दिलेल्या रकमेचा महाराष्ट्र सदनशी संबंध जोडण्यात आला आहे. त्यातच राज्याला महाराष्ट्र सदन कंत्राटप्रकरणी ज्या वास्तुरचनाकार शिरीष सुखात्मे यांच्याकडून घाईगर्दीने अहवाल मागवून घेण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्र सदन प्रकरणातील घोटाळ्याबाबत संदिग्धताच निर्माण झाली आहे. या प्रकरणी आरोपी असलेले अनिलकुमार गायकवाड या मुख्य अभियंत्याचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्त करण्यात आले आहे. भुजबळांविरुद्धचा भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी या प्रकरणांचा वापर करण्यात आला असला तरी न्यायालयात फक्त इंडिया बुल प्रकरणातील लाचेचे प्रकरण टिकू शकते, असे एसीबीचे अधिकारीही मान्य करतात. गायकवाड यांना पुन्हा सेवेत घेतल्यामुळे महाराष्ट्र सदन प्रकरणात कंत्राटाच्या वितरणात तथ्य नसल्याचे एक प्रकारे मान्य करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • आर. आर. पाटील गृहमंत्री असताना महाराष्ट्र सदन प्रकरणात रीतसर चौकशी झाली होती, त्यात एसीबीनेच काहीही घोटाळा नसल्याचा अहवाल दिला होता.
  • भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर गृहखात्याला पाठविलेल्या पत्रातही महाराष्ट्र सदन कंत्राटाच्या वितरणात कुठलाही घोटाळा नसल्याचाच अहवाल एसीबीचे तत्कालीन महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिला होता.
  • प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ‘आप’च्या अंजली दमानिया यांच्या फक्त दोन आरोपांचीच चौकशी झाली आणि त्यात महाराष्ट्र सदन व कालिना येथील राज्य ग्रंथालयाच्या प्रकरणात भुजबळ व इतरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
  • ‘आप’च्या आरोपांमध्ये घाटकोपर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुनर्विकास प्रकल्पाचाही समावेश होता; परंतु भाजपशी संबंधित असलेल्या विकासकाविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2017 1:42 am

Web Title: maharashtra sadan scam maharashtra sadan chief engineer
Next Stories
1 राणे यांना गडकरींचा चिमटा; तर सुशीलकुमारांचा ‘प्रेमळ’ सल्ला!
2 Shiv Sena Support BJP in President Election: शिवसेनेचा नरमाईचा सूर
3 वित्तीय सेवा केंद्राला बुलेट ट्रेनची धडक?
Just Now!
X